पहलगाम हल्ला ‘एनआयए’कडून धरपकड, शेकडो जणांना अटक, 60 ठिकाणी छापेमारी

Pahalgam attack: दशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या लोकांविरोधात एनआयएकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. श्रीनगरमधील दशतवाद्यांना मदत करणाऱ्यांचे संशय असणाऱ्या 60 पेक्षा जास्त जणांकडे छापासत्र राबवले आहे.

पहलगाम हल्ला एनआयएकडून धरपकड, शेकडो जणांना अटक, 60 ठिकाणी छापेमारी
Pahalgam attack NIA
| Updated on: Apr 27, 2025 | 8:11 AM

Pahalgam attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने आता तपास सुरु केला आहे. सरकारकडून दहशतवादी आणि त्यांच्या नेत्यांना संपवण्याची तयारी सुरु झाली आहे. लश्कर ए तयैबाचा कमांडर शाहिद अहमद कुट्टे याच्यासह सहा दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करण्यात आली. दहशतवादी लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहे. दहशतवाद्यांच्या शेकडो सहकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या १४ स्थानिक दहशतवाद्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. २२ पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. पुलमावा हल्ल्यानंतर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. या घटनेचा तपास एनआयएकडे देण्यात आला आहे. एनआयएचे अधिकारी घटनास्थळी जे पर्यटक होते त्यांच्या गावी जाऊन त्यांच्याकडून पुरावे जमा करत आहे. तसेच स्थानिक लोकांकडून चौकशी केली जात आहे. दशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरु करण्यात आली आहे. मागील ४८ तासांत सहा दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त केली आहे.

दशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या लोकांविरोधात एनआयएकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. श्रीनगरमधील दशतवाद्यांना मदत करणाऱ्यांचे संशय असणाऱ्या 60 पेक्षा जास्त जणांकडे छापासत्र राबवले आहे. अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाने दक्षता वाढवली आहे. सतत शोध मोहीम राबवली जात आहे. कोणत्याही संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाभर फिरते वाहन तपासणी नाके उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कुपवाडा येथे दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त करून सुरक्षा दलांनी एक मोठा कट उधळून लावला आहे. तेथून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. त्यात मुश्ताकाबाद मच्छिलमधील सेदोरी नाला वनक्षेत्रातून पाच एके-47, आठ मॅगजीन, एक-एक पिस्तूल आणि मॅगजीन, एके-47 ची 660 गोळ्या यांचा समावेश आहे.