अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेम्स डेव्हिड व्हान्स यांचे खळबळजनक वक्तव्य
Image Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
pahalgam terror attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढला आहे. भारत पाकिस्तानवर मोठी कारवाई करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्या कारवाईची धास्ती पाकिस्तानी नेत्यांनी घेतली आहे. भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेम्स डेव्हिड व्हान्स यांचे खळबळजनक वक्तव्य समोर आले आहे. कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद्यांची साथ देणाऱ्यांना सोडण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. व्हान्स यांच्या वक्तव्यानंतर भारत मोठी कारवाई करणार असल्याचे संकेत मिळत आहे.
दहशतवाद्यांचा खात्मा करा…
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेम्स डेव्हिड व्हान्स यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याचा प्लॅन तयार झाल्याचे म्हटले आहे. पहलगाम हल्ल्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, भारत आणि पाकिस्तान दरम्यान थेट युद्ध होऊ नये. अमेरिकेसह अनेक देशांची हीच भूमिका आहे. दहशतवादाविरोधात पाकिस्तानने भारताला मदत केली पाहिजे. तसेच पाकिस्तानात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा भारताने केला पाहिजे. ही कारवाई पाकिस्तानसाठी ओसामा बिन लादेन मारल्यापेक्षाही भयंकर असायला हवी.
व्हान्स यांच्या वक्तव्याचा अर्थ काय?
- स्पेशल टीमने सिमीपलीकडे जाऊन टॉप टारगेट्सचा खात्मा केला पाहिजे. भारताच्या स्पेशल फोर्सकडे या पद्धतीची क्षमता आहे. हे ऑपरेशन पाकिस्तानला समजू न देता करता येईल.
- भारताने इस्त्रायल, अमेरिकेप्रमाणे स्मार्ट ड्रोनने हल्ला केला पाहिजे. त्यामुळे दहशतवाद्यांचा खात्मा होऊ शकतो. त्याची जबाबदारी थेट भारताने घ्यावी. हे मिशन संवेदनशीलतेवर अवलंबून असणार आहे.
- भारताने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी स्थानिक नेटवर्क किंवा पाकिस्तानात असलेल्या नेटवर्कचा वापर करावा. स्वत: जमिनीवरील युद्धपासून लांब राहून या पद्धतीने कारवाई करता येईल.
- अत्याधुनिक ट्रॅकिंग, सोशल मीडिया, कॉल इंटरसेप्ट्सच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे लाईव्ह लोकेशन ट्रेस केले जावे. इस्त्रायलच्या पद्धतीने या माध्यमातून दहशतवाद्यांचा खात्मा करता येईल.
- पाकिस्तानवर एकीकडे आंतरराष्ट्रीय दबाब आणावा आणि दुसरीकडे सर्जिकल स्ट्राईक केली जावी. त्याचे पुरावे मागे ठेऊ नये. परंतु परिणाम मोठा झाला पाहिजे.