आम्ही हातात बांगड्या…, पकिस्तानचा सर्वनाश करण्यासाठी किन्नर समाज पुढे, केली मोठी घोषणा
Pahalgam Terror Attack: पकिस्तानचा सर्वनाश करण्यासाठी किन्नर समाज पुढे, मोठी घोषणा करत म्हणाले, 'पंतप्रधान मोदींसोबत संपूर्ण ट्रान्सजेंडर समुदाय, गरज पडल्यास बॉर्डरवर जाऊन...'

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील ॲक्शन मोडवर आहेत. आता देशाचा किन्नर समाज देखील पाकिस्तानच्या विरोधात पुढे आला आहे. 1 मे ते 10 मे दरम्यान दौसा येथे होणाऱ्या अखिल भारतीय किन्नर परिषदेत देशभरातील किन्नर एकत्र येत आहेत आणि पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत आहेत. यावेळी किन्नर समाजाने ‘हिंदूस्तान जिंदाबाद आणि पाकिस्तान मुर्दाबाद…’ असे नारे देखील लावले.
किन्नर समाजातील लोक पाकिस्तानच्या सर्वनाशासाठी आणि भारतातील प्रत्येक मुलाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करताना दिसले. यावेळी किन्नर समाजाने पाकिस्तान विरोधात तिव्र भावना देखील व्यक्त केल्या. ‘देशातील पूर्ण किन्नर समाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे. गरज पडल्यास बॉर्डरवर देखील किन्नर समाज येण्यासाठी तयार आहे.’
‘यावेळी एवढी मोठी घटना घडूनही अद्याप कोणतीही विशेष कारवाई झालेली नाही, अशा परिस्थितीत आपण आता गप्प बसून चालणार नाही कठोर कारवाई झालीच पाहिजे. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. पाकिस्तानमधील काही लोक धमक्या देत आहेत पण आपल्या देशाचे सैनिक पूर्णपणे सतर्क आहेत आणि पाकिस्तानला योग्य उत्तर देतील.’ अशाप्रकारे पहलगाम घटनेबाबत किन्नर समाजामध्ये संताप दिसून आला.
सांगायचं झालं तर, 10 मे पर्यंत चालणाऱ्या या भव्य कार्यक्रमाची सुरुवात गुरुवारी सकाळी किन्नर समुदायाच्या पूजनीय देवी बहुचराच्या पूजेने झाली. हा भव्य कार्यक्रम केवळ किन्नर समुदायाच्या संस्कृती आणि परंपरांना उजाळा देणारा असून समाजातील एकतेचं दर्शन घडवणारा आहे. देशातील विविध राज्यांमधून दोन ते तीन हजार किन्नर सहभागी होत आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ला
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हल्ल्यात अनेक जण गंभीर दखमी देखील झाले आहेत. पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतापाचं वातावरण आहे. सोशल मीडियावर हल्ल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत.
