दहशतवादी सात दिवशांपूर्वीच पहलगाममध्ये, बैसरनसह चार पर्यटन स्थळांवर हल्ल्याची योजना, तपासातून धक्कादायक माहिती समोर
Pahalgam terror attack: एनआयए आणि काश्मीर पोलिसांना आतापर्यंत 20 पेक्षा जास्त ओव्हर ग्राउंड वर्करची ओळख पटली आहे. त्यातील काही जणांना अटक झाली आहे. त्यातील चौघांनी पाकिस्तानी दहशदवाद्यांना रेकी करण्यासाठी मदत केली होती.

Pahalgam terror attack: जम्मू-कश्मीरमधील पहलगाम हल्लाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) देण्यात आला आहे. या तपासातून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनआयएला महत्वाचे पुरावे मिळाले आहे. हल्ल्याच्या सात दिवसांपूर्वी दहशतवादी पहलगाममध्ये दाखल झाले होते. या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर फक्त बैसरन खोरेच नाही तर अन्य तीन पर्यटन स्थळही असल्याचे तपासातून समोर आले आहे. तसेच दहशतवाद्यांच्या टूलकीटमधूनही त्यांना देण्यात आलेले आदेश समोर आले आहे.
186 जणांना अटक
पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील संशयित लोकांना ताब्यात घेतले जात आहे. हल्ल्यानंतर आतापर्यंत 2500 पेक्षा जास्त संशयित लोकांना पकडण्यात आले आहे. त्यातील 186 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरु आहे. एनआयएने 80 ओव्हरग्राउंड वर्कर्सला ताब्यात घेतले आहे. त्यांची सातत्याने चौकशी सुरु आहे. त्यात अनेक धक्कादायक माहिती मिळत आहे.
या ठिकाणी हल्ल्याची होती योजना
हल्लेखोर दहशतवादी एका आठवड्यापूर्वी 15 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पोहचल्याचे समोर आले आहे. त्या दहशतवाद्यांचे टार्गेट केवळ वैसरन खोरेच नाही तर पहलगाममधील अन्य तीन पर्यटनस्थळ होते. त्यासाठी रेकीसुद्धा करण्यात आली होती. वैसरन खोऱ्याशिवाय इतर तीन ठिकाणी सुरक्षा जास्त असल्याने तो प्लॅन रद्द करण्यात आला. हल्ला करण्याच्या दोन दिवसांपूर्वीच बैसरन खोऱ्यात दहशतवादी दाखल झाले होते. आरु खोरे, एम्यूजमेंट पार्क आणि बेताब खोरे या तीन ठिकाणी त्यांना हल्ला करायचा होता. परंतु त्यांचा हा प्लॅन सुरक्षा व्यवस्थेमुळे अयशस्वी झाला.
एनआयए आणि काश्मीर पोलिसांना आतापर्यंत 20 पेक्षा जास्त ओव्हर ग्राउंड वर्करची ओळख पटली आहे. त्यातील काही जणांना अटक झाली आहे. त्यातील चौघांनी पाकिस्तानी दहशदवाद्यांना रेकी करण्यासाठी मदत केली होती. दहशतवाद्यांचे टूलकीट समोर आले होते. त्यानुसार, प्रवासादरम्यान इस्लामिक पोशाखांपासून दूर रहाण्याचे आदेश त्यांना दिले होते. भारतात ज्या शहरात जाणार त्या शहराच्या रीतिरिवाजांनुसार कपडे घाला, असे त्यांना सांगण्यात आले होते.
