पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांकडून काही हजार रुपये घेऊन ‘त्या’ दोघांनी दिला आश्रय, NIA कडे कबुली
Pahalgam Terror Attack: राष्ट्रीय तपास संस्थाने रविवारी दोन काश्मीर लोकांना अटक केली होती. परवेझ अहमद जोठार आणि बशीर अहमद जोठार अशी त्यांची नावे आहेत. त्या दोघांवर गंभीर आरोप आहेत. त्यांनी तीन दहशतवाद्यांना मदत केली.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या काश्मीरमधील दोघांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रविवारी अटक केली. या लोकांवर गंभीर आरोप आहे. परवेझ अहमद जोठार आणि बशीर अहमद जोठार या दोघांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना झोपडीत आश्रय दिला होता. त्यांना जेवणही दिले. हे तिन्ही दहशतवादी लश्कर-ए-तैयबाशी संबंधित होते. हे दहशतवादी हत्याकांड घडवणार असल्याचे परवेझ आणि बशीर यांना माहीत होते. परंतु काही हजार रुपयांसाठी त्यांनी दहशतवाद्यांची मदत केल्याचे एनआयएकडे मान्य केले.
हल्ल्याची माहिती होती…
राष्ट्रीय तपास संस्थाने रविवारी दोन काश्मीर लोकांना अटक केली होती. परवेझ अहमद जोठार आणि बशीर अहमद जोठार अशी त्यांची नावे आहेत. त्या दोघांवर गंभीर आरोप आहेत. तीन दहशतवाद्यांना त्यांनी आश्रय दिला. ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर दहशतवादी एका झोपडीत थांबले होते. त्यानंतर त्यांनी रेकी केली. २२ एप्रिल रोजी २६ पर्यंटकांची हत्या केली. परवेझ आणि बशीर यांना दहशतवादी काश्मीरमध्ये हल्ला करणार असल्याचे माहीत होते. त्यानंतरही त्यांनी काही हजार रुपयांसाठी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचे तपासात कबुल केले.
परवेझ आणि बशीर यांना सोमवारी जम्मूमधील एनआयए कोर्टात आणण्यात आले. कोर्टाने त्यांना पाच दिवसांची एनआयए कोठडी दिली. या दोघांनी तिन्ही आरोपींची ओळख सांगितली आहे. परंतु एनआयएला अनेक पुरावे अजून जमा करायचे आहेत. दहशतवाद्यांची माहिती योग्य वेळी जाहीर करण्यात येणार असल्याचे एनआयएने म्हटले आहे.
सुरक्षेची दिली माहिती…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परवेझ आणि बशीर फक्त आश्रय देणार नव्हते तर त्यांनी दहशतवाद्यांना इतर माहितीही दिली. एका अधिकाऱ्यांने सांगितले की, परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची माहिती या दोघांनी दहशतवाद्यांना दिली. त्यामुळे दहशतवाद्यांना योजना बनवणे आणि हल्ला करणे त्यानंतर पळून जाण्यात मदत मिळाली. परवेझ आणि बशीर यांना माहीत होते की बैसरनमध्ये पर्यटकांवर हल्ला करण्याची योजना आहे. कारण त्यावेळी तिथे खूप पर्यटक आले होते. ते त्या भागात टट्टू चालवत असत. त्यामुळे त्यांना पोलिस आणि सुरक्षा चौक्यांबद्दल पूर्ण माहिती होती.
