
मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानात संघर्ष पहायला मिळाला होता. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. या ऑपरेशनमध्ये भारताने पाकिस्तानातील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. यात 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या संघर्षच्या काळात पाकिस्तानसह भारताच्या इतरही शत्रूंची माहिती समोर आली होती.
भारत गेल्या काही काळापासून प्रत्येक देशाशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात भारतीय नागरिक कोणत्या देशाला सर्वात मोठा शत्रू मानतात याबाबत माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील प्यू रिसर्च या संस्थेने एक अहवाल सादर केला आहे. यात अमेरिका, चीन की पाकिस्तान यापैकी कोणता देश भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे याची माहिती देण्यात आली आहे.
भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण?
प्यू रिसर्च संस्थेच्या सर्वेक्षणात अनेक भारतीय लोकांनी सहभाग घेतला होता. यातील 2 टक्के लोकांनी अमेरिकेला भारताचा शत्रू मानले आहे. तसेच 33 टक्के भारतीय लोकांनी चीनला भारताचा मोठा शत्रू मानले आहेृ. मात्र भारतातील सर्वात जास्त म्हणजे 41 टक्के लोकांनी पाकिस्तानला भारताचा सर्वात मोठा शत्रू मानले आहे. पाकिस्तानकडून भारताला सर्वात मोठा धोका असल्याचे या लोकांनी म्हटले आहे.
पाकिस्तान आणि चीन भारताचे शत्रू का आहेत?
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताने चीनसोबत एक आणि आणि पाकिस्तानसोबत चार युद्धे लढली आहेत. हे दोन्ही देश भारतीय जमिनीवर आपला हक्क गाजवतात. तसेत पाकिस्तान भारतात दहशतवाद पसरवण्याचे काम करतो. तसेच चीन भारताला वेढण्यासाठी समुद्रात आणि जागतिक व्यासपीठांवर ताकदीचा वापर करतो. तसेच चीनने अनेकदा संयुक्त जागतिक व्यासपीठांवर पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे भारतीय लोक या देशांना सर्वात मोठा शत्रू मानतात. त्याचबरोबर तुर्की आणि अझरबैजान हे देशही भारताचे शत्रू आहेत. या देशांनी भारत-पाक संघर्ष झाला त्यावेळी पाकिस्तानला पाठिंबा दिला होता.