भारताला जे जमले नाही ते पाकिस्तानने करून दाखवले, थेट पेट्रोल डिझेलच्या..

इराण आणि अमेरिका युद्धात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. भारत सरकारने यादरम्यान पेट्रोल डीझेलच्या किमती वाढवल्या. आता पाकिस्तान सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला.

भारताला जे जमले नाही ते पाकिस्तानने करून दाखवले, थेट पेट्रोल डिझेलच्या..
Petrol and Diesel Pakistan bigg decision
| Updated on: Jul 21, 2026 | 7:45 AM

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. जागतिक बाजारावर या युद्धाचा परिणाम होत आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत यांच्यावरही या युद्धाचा परिणाम होत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात तब्बल 4 वेळा पेट्रोल डिझेलचे भाव भारतात वाढले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत असताना भारतात पेट्रोल डीझेलचे भाव स्थिर आहेत. मात्र, पण भारतीय तेल कंपन्यांवर मोठा दबाव आहे. मोठे नुकसान या कंपन्यांना सहन करावे लागत आहे. जागतिक बाजारात सतत कच्च्या तेलाच्या किमतीमधील चढउतारच्या मुद्द्यात पाकिस्तान सरकारने मोठा निर्णय घेतला. याबाबत भारताच्याही पुढे पाकिस्तान निघून गेला.

देशातील इंधन दरवाढीचा ताण कमी करण्यासाठी आणि पारदर्शकता ठेवण्यासाठी दररोज पेट्रोल डीझेलच्या किमती सुधारल्या जातील. म्हणजेच दररोज पेट्रोल डीझेलच्या किमती ठरवल्या जातील. ज्यामुळे तेल कंपन्यांवरील दबाव कमी होण्यास मदत होईल. नुकताच याबाबतची घोषणा पाकिस्तान सरकारने केली. अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात तेलाचे दर आठवड्याला निश्चित केले जात होते.

जवळपास 15 दिवसांनी ते बदलत होते. मात्र, आता पाकिस्तान सरकारने मोठा निर्णय घेत जाहीर केले की, दररोज पेट्रोल डिझेलचे दर ठरवले जातील. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावाचा अंदाज घेऊन तेलाच्या भावात बदल होईल. इराण आणि अमेरिका युद्धाला सुरूवात झाल्यापासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत आहेत. त्यामध्येच मध्यंतरी दोन्ही देशांकडून हल्ले थांबवण्यात आली होती.

त्यावेळी जागतिक बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे भाव घसरताना दिसले. आता युद्ध पेटल्यानंतर पुन्हा एकदा भावात मोठी वाढ होत आहे. भारतात कच्च्या तेलाचा मोठा तुटवडा होता. त्यावेळीही भारताचा जिगरी मित्र रशिया भारताच्या मदतीला धावून आला. भारताला मोठ्या प्रमाणात तेल पुरवढा रशियाने केला. ज्यामुळे बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यासारखी परिस्थिती भारतावर आली नाही. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धातील तणाव कमी झाला, त्यावेळी पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील, असा अंदाज होता. त्याच युद्ध भडकले.

Follow Us