AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explained : ‘सुधर जाओ पाकिस्तान’, कदाचित भारताने दिलेली ही शेवटची संधी असेल

Explained : पाकिस्तानने काही गोष्ट समजून घेतल्या पाहिजेत. वेळ आणि परिस्थिती बदलली आहे. आता हा तो पूर्वीचा भारत राहिलेला नाही. हा नवीन भारत आहे. घर में घुसके मारेंगे. वास्तवात सलग दोन दिवस भारताने असं करुन सुद्धा दाखवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानने वेळीच सुधारावं. कदाचित त्यांना पुढची संधी मिळणार नाही.

Explained :  'सुधर जाओ पाकिस्तान', कदाचित भारताने दिलेली ही शेवटची संधी असेल
Updated on: May 08, 2025 | 4:59 PM
Share

‘सुधर जाओ पाकिस्तान’ असच म्हणावं लागेल. कदाचित भारताने पाकिस्तानला दिलेली ही शेवटची संधी असू शकते. सध्याच्या परिस्थिती ते पार गोंधळून गेलेले आहेत. आपली इज्जत वाचवण्यासाठी म्हणून पाकिस्तान नको ती कृत्य करत आहे. सर्वप्रथम पहलगाम दहशतवादी हल्ला घडवून सुरुवात त्यांनी केली. पाकिस्तानच्या सहभागाशिवाय इतका मोठा हल्ला होऊच शकत नाही, हे वास्तव स्वीकारायला ते तयार नाही. त्यात एक पाकिस्तानी कमांडो होता, त्याचे पुरावे सुद्धा भारताने दिले, तरी पाकिस्तान ऐकायला तयार नाही. उलट भारतालाच युद्धाची, अणूबॉम्बची धमकी देत होता. भारताने याआधी 2016 आणि 2019 ला आता हा पूर्वीचा सहन करणारा भारत नाही हे दाखवून दिलय. तरीही त्यांनी पहलगाम घडवून आणला.

भारत या हल्ल्याचा बदला घेणार हे स्पष्ट होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीरपणे सांगितलेलं, पहगामचे हल्लेखोर आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडची शिक्षा देणार. पीएम मोदी जे बोलले होते, तसं त्यांनी करुन दाखवलं. भारत सरकारने पहिल्यांदा पाकिस्तानात इतका मोठा एअर स्ट्राइक केला. पाकिस्तान आणि POK मधील 9 दहशतवादी तळ उडवले. भारताने ही कारवाई फक्त दहशतवाद्यांविरुद्ध केली होती. भारत सरकारने कारवाईनंतर पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. आमची कारवाई फक्त दहशतवादाविरुद्ध आहे. आम्हाला तणाव वाढवायचा नाही, असं सांगितलेलं. पण तरीही पाकिस्तानने आपली नीचता दाखवून दिली.

15 शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न

7 आणि 8 मे च्या रात्री पाकिस्तानने भारतातील 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठानकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, अदमपुर, बठिंडा, चंडीगढ़, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज सारख्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. भारताकडे असलेल्या अत्याधुनिक S-400 सिस्टिमने पाकिस्तानचा मिसाईल, ड्रोन हल्ले फेल ठरवला.

शहाबाज शरीफ चुकीच बोलले

त्यानंतर भारताने, पाकिस्तानच्या या हल्ल्याचा बदला म्हणून 50 ड्रोन हल्ले घडवले. लाहोरची एअर डिफेन्स सिस्टिम उद्धवस्त केली. महत्त्वाच म्हणजे जिथून हल्ला झाला, त्याच ठिकाणांना फक्त लक्ष्य केलं. भारताने दहशतवाद्यांवर कारवाई केलेली. पाकिस्तानच्या सैन्य तळांवर हल्ले केले नव्हते, तरीही पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी याला Act of war ठरवलं.

पाकिस्तानसाठी ही शेवटची संधी असू शकते

वास्तविक पाकिस्तानने काल रात्री जे केलं, त्याला Act of war म्हणतात. कारण त्यांनी भारताच्या सैन्य ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. आज सकाळी बदला म्हणून भारताला पाकिस्तानात मोठा विद्धवंस घडवता आला असता. पण भारताने ड्रोन हल्ले करताना संयम बाळगला. मर्यादीत स्वरुपात कारवाई केली. भारताने या कारवाईद्वारे आपली तयारी आणि क्षमता दाखवून दिलीय. पाकिस्तानने वेळीच सुधरावं. कदाचित भारताने त्यांना दिलेली ही शेवटची संधी असू शकते.

मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा
मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा.
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?.
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी.
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन.
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट.
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही....
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही.....
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल.
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात.
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन.
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात.