
ऑपरेशन सिंदूरच्यावेळचा एक असा फोटो समोर आलाय, जो याआधी बाहेर आला नव्हता. हा फोटो पाकिस्तानी सैन्याचा पराभव आणि त्यांच्या मागे हटण्याचा पुरावा आहे. पहिल्यांदा समोर आलेल्या या फोटोवरुन संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना पाकिस्तान कसे गुडघे टेकले ते दिसून येतं. ऑपरेशन सिंदूर भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांविरुद्ध लॉन्च केलं होतं. पण पाकिस्तानने त्याला आपलं युद्ध बनवलं. चार दिवस भारत-पाकिस्तानमध्ये सैन्य संघर्ष झाला. 1971 च्या युद्धानंतर भारताने प्रथमच पाकिस्तानला पुढची काही वर्ष लक्षात राहिलं असा धडा शिकवला. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये आपली रणनिती आणि शक्तीचा परिचय दिला. याच कारणामुळे पाकिस्तानला मागे हटावं लागलं. अजूनपर्यंत काही गोष्टी गोपनीय होत्या. पण आता एक फोटो समोर आलाय. त्यावरुन भारताचा विजय आणि पाकिस्तानची कमजोरी स्पष्ट होते.
हा फोटो स्पष्ट पुरावा आहे की, पाकिस्तानी सैन्य आणि वॉरशिप संघर्षाच्या काळात मागे हटल्या. खासकरुन कराची बंदरात उभ्या असलेल्या युद्धनौकांचे फोटो पुरावा आहेत की, ते युद्ध लढण्याच्या स्थितीतमध्ये नव्हते. काही फोटोंमध्ये पाकिस्तानी युद्धनौकांनी इराणच्या सीमेजवळ शरण घेतल्याच दिसून आलय. हा त्यांच्या पराभवाचा स्पष्ट पुरावा आहे. फोटोंमध्ये स्पष्ट दिसतय की, युद्ध टिपेला पोहोचलेल असताना त्यावेळी पाकिस्तानी युद्धनौका इराणच्या सीमेजवळ जाऊन लपलेल्या. यातून त्यांची रणनितीक असमर्थता दिसून येते.
कुठल्या बंदरात आश्रय घेतलेला?
पाकिस्तानी युद्धनौकांनी इराणच्या सीमेजवळ आश्रय घेतलेला. कराचीपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्वादर बंदरात पाकिस्तानच्या मुख्य युद्धनौका थांबल्या होत्या. भारतीय मिसाइलच्या रेंजमधून बचाव करण्यासाठी नाईलाजाने पाकिस्तानी नौदलाला हे पाऊल उचलावं लागलेल. ग्वादर हे पाकिस्तानी बंदर असून ते इराणच्या सीमेजवळ आहे. भारतीय मिसाइल्सच्या रेंजमधून वाचण्यासाठी पाकिस्तानी युद्धनौकांनी इराणी सीमेजवळ आश्रय घेतलेला.
भारतीय नौदलाने संयम दाखवला
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानला पुढची अनेक वर्ष लक्षात राहिल असा धडा शिकवला आहे. इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानी एअर फोर्सचे 11 बेस उडवले. म्हणजे धावपट्टीच उखडून टाकली. त्यांची क्षमता संपवली. त्याचवेळी पाकिस्तानने डागलेले ड्रोन्स आणि बॅलेस्टिक मिसाइल्स हवेतच नष्ट केले. हे युद्ध सुरु असताना भारतीय नौदलही अरबी समुद्रात सक्रीय होत. 9-10 मे च्या रात्री भारतीय नौदलाने संयम दाखवला. त्यांनी थोडी जरी ताकद दाखवली असती, तर पाकिस्तानच्या नाकीनऊ आले असते. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानचे 100 दहशतवादी मारले. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच कुटुंब संपवलं.