AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळेमधून येत होता विचित्र आवाज, जमीन खोदताच विद्यार्थी हादरले, शिक्षकांना घाम फुटला, गावकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली

अनेकदा काही अनेपेक्षित घटना घडत असतात, अशीच एक घटना एका शाळेच्या इमारतीमध्ये घडली आहे. जेव्हा ही जमीन खोदण्यात आली तेव्हा विद्यार्थी आणि शिक्षक चांगलेच हादरले, गावकऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

शाळेमधून येत होता विचित्र आवाज, जमीन खोदताच विद्यार्थी हादरले, शिक्षकांना घाम फुटला, गावकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली
schoolImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 11, 2026 | 9:59 PM
Share

अनेकदा अशा काही अनेपेक्षित घटना घडतात की त्यावर लवकर कोणाचा विश्वास देखील बसू शकत नाही. अशीच एक घटना आता समोर आली आहे. जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा या गावातील लोकांनाही चांगला धक्का बसला आहे. लोकांनी हे दृश्य पाहाण्यासाठी मोठी गर्दी केली. ही घटना एका शाळेच्या इमारतीमध्ये घडली आहे. या शाळेबद्दल सुरुवातीपासून अनेक चित्रविचित्र दावे करण्यात येत होते. या शाळेची इमारत खूप जुनी आहे, शाळेच्या इमारतीच्या एका खोलीमध्ये विद्यार्थ्यांसाठी खास जीमची सोय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यी जेव्हा व्यायामाला जायचे, तेव्हा त्यांना त्या खोलीच्या तळातून चित्र विचित्र आवाज यायचे. हा अनुभव या विद्यार्थ्यांसाठी भयंकर असायचा. शेवटी एक दिवस या विद्यार्थ्यांनी नेमकं या मागे काय असू शकतं? याचा शोध लावण्याचा निश्चय केला आणि काही विद्यार्थ्यांनी टॉर्च घेऊन व्यायाम शाळेची ती खोली खोदण्यास सुरुवात केली. जेव्हा त्यांनी ही खोली खोदली तेव्हा समोरचं दृश्य पासून त्यांच्या पायाखालीच जमीनच सरकली.

शाळेच्या इमारतीच्या ज्या भागातून चित्र-विचित्र आवाज येते होते, त्या जागेवर खोदलं असताना त्यांना खाली एक सुंदर असा महाल दिसून आला. हा महाल जवळपास 1800 वर्ष जुना आहे. रोमन साम्राज्याच्या काळातील हा महाल आहे. ही घटना इटलीची राजधानी रोममध्ये घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार रोममधील ‘लिशियो साइंटिफिको कावूर’ नावाच्या शाळेत ही घटना घडली आहे. 19 व्या शतकात या शाळेची इमारत या जागेवर बांधण्यात आली होती. जेव्हा या इमारतीचं बांधकाम सुरू होतं, तेव्हाच पाया खोदताना या इमारतीच्या पायामध्ये रोम संस्कृतीचे काही अवशेष आढळून आले होते. मात्र तेव्हा त्यावर कोणत्याही प्रकारचं विस्तृत असा अभ्यास झाला नव्हता. त्यानंतर ही इमारत बांधण्यात आली.

परंतु या इमारतीच्या ज्या भागामध्ये विद्यार्थ्यांना व्यायाम करण्याची व्यवस्था करण्यात आली होती, त्या जागेतून नेहमीच चित्र विचित्र आवाज येत होते. शेवटी विद्यार्थ्यांनी तिथे नक्की काय आहे? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रात्रीच्या अंधारामध्ये टॉर्चच्या मदतीने तेवढी जागा पूर्ण खोदून काढली, त्यांना तिथे एक सुरूंग आढळून आला, त्यांनी या सुरूंगात जाऊन पाहिले असता त्यांनी तिथे एक सुंदर असा रोमन साम्राज्यातील महाल आढळून आला आहे. हा महाल पाहून ग्रामस्थ आणि शिक्षकांना देखील चांगलाच धक्का बसला आहे.

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा