AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur wari 2022: आषाढीच्या तोंडावर चंद्रभागेच्या तीरावरील घाटांचे स्ट्रक्चर ऑडिट; उच्च न्यायालयाच्या सूचना

पंढरपूर, पंढरपुरात चंद्रभागेच्या (chandrabhaga) काठावर भाविकांसाठी पुरातन आणि नव्याने शासनाने बांधलेले 7 घाट (Pandharpur Ghat) आहेत. यापैकी कुंभार घाटानजीक सन 2020 मध्ये नव्याने बांधलेल्या घाट हा कोसळला होता. यामध्ये  6 भाविकांचा घाटाखाली मृत्यू झाला. याबाबत वकील अजिंक्य संगीतराव आणि राकेश भाटकर यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर आता न्यायालयाकडून आषाढी […]

Pandharpur wari 2022: आषाढीच्या तोंडावर चंद्रभागेच्या तीरावरील घाटांचे स्ट्रक्चर ऑडिट; उच्च न्यायालयाच्या सूचना
| Edited By: Nitish Gadge | Updated on: Jul 02, 2022 | 8:14 PM
Share

पंढरपूर, पंढरपुरात चंद्रभागेच्या (chandrabhaga) काठावर भाविकांसाठी पुरातन आणि नव्याने शासनाने बांधलेले 7 घाट (Pandharpur Ghat) आहेत. यापैकी कुंभार घाटानजीक सन 2020 मध्ये नव्याने बांधलेल्या घाट हा कोसळला होता. यामध्ये  6 भाविकांचा घाटाखाली मृत्यू झाला. याबाबत वकील अजिंक्य संगीतराव आणि राकेश भाटकर यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर आता न्यायालयाकडून आषाढी यात्रेच्या (Ashadhi yatra 2022) पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेचा विचार करुन सर्व घाटांची स्ट्रक्चरल ऑडिट (Structure audit) करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.

इंदापूरात पार पडला पहिला रिंगण सोहळा

मजल दर मजल करीत वैष्णवांची वारी (Pandharpur Wari 2022) पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे.  विठ्ठल-ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करीत वैष्णवांच्या जनसागरात, लाल मातीच्या गोल रिंगणधारी पांढऱ्याशुभ्र कडांवरून मानाचे अश्व धावले (Indapur Frist ringan sohala). उत्साही, आनंदमय वातावरणात रिंगण सोहळा आज इंदापूर शहरातील सौ कस्तुरा बाई श्रीपती कदम या विद्यालयात आश्र्वाचे गोल रिंगण पार पडले,  रिंगणाचा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. अनेक दिवसांचा पायी प्रवास, ऊन पावसाची तमा न बाळगता भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन वारकरी  पांडुरगाच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या  सर्व वारकरी, टाळकरी, माळकरी, वीणेकरी , तुळशीवाल्या महिला पालखीभोवती हरिनामाचा गजर करीत रिंगणाभोवती उभ्या होत्या.

पांडुरंगा भेटायची आस, आतुरले नयन, विठ्ठल वाणी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकाराम ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करीत संत तुकाराममहाराज पालखी सोहळा निमगाव केतकी येथील मुक्काम आटोपून इंदापूर शहरात दाखल झाला सकाळी 11,30 वाजता रिंगण सुरू झाले. पालखी सोहळा रिंगणाच्या ठिकाणी हरिनामाच्या जयघोषात दाखल झाला. या वेळी गावात भक्तिमय वातावरणात रिंगणसोहळा सुरू झाला.  सर्व दिडय़ांनी पालखीला प्रदक्षिणा घातली. यानंतर विठू नामाचा गजर करीत वारकरी  खांद्यावर पताका घेऊन धावले. त्यांच्यामागे डोक्यावर हंडा व तुळशी घेऊन महिला वारकरी  धावल्या नंतर विणेकरी धावले. शेवटी लक्ष लक्ष नयनांनी क्षण टिपावा असा क्षण आला. मानाचे अश्व धावण्यास सुरुवात झाली, एका पाठोपाठ एक असे अश्व धावले. अश्वधावण्याच्या अगोदर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या आश्वांची पूजा केली होती.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?