Pandharpur wari 2022: आषाढीसाठी लाडूंचा महाप्रसाद, 8 लाख बुंदी लाडू तर 3 लाख राजगिरा लाडूंची विक्री होणार

पंढरपूर, कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद असलेला विठुरायाच्या लाडू प्रसादाची आता विक्री सुरू झाली आहे (Pandharpur wari 2022) . मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते लाडू विक्रीचा प्रारंभ करण्यात आला‌. तब्बल दोन वर्षांनंतर भाविकांना लाडू प्रसादाचा आस्वाद घेता आला. श्री. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी  दररोज मोठ्या प्रमाणत भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना विठुरायाचा प्रसाद अल्पदरात  उपलब्ध […]

Pandharpur wari 2022: आषाढीसाठी लाडूंचा महाप्रसाद, 8 लाख बुंदी लाडू तर 3 लाख राजगिरा लाडूंची विक्री होणार
नितीश गाडगे

|

Jul 02, 2022 | 10:44 AM

पंढरपूर, कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद असलेला विठुरायाच्या लाडू प्रसादाची आता विक्री सुरू झाली आहे (Pandharpur wari 2022) . मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते लाडू विक्रीचा प्रारंभ करण्यात आला‌. तब्बल दोन वर्षांनंतर भाविकांना लाडू प्रसादाचा आस्वाद घेता आला. श्री. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी  दररोज मोठ्या प्रमाणत भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना विठुरायाचा प्रसाद अल्पदरात  उपलब्ध व्हावा यासाठी मंदीर समितीच्या वतीने लाडू प्रसाद विक्री केली जाते. कोरोनामुळे मागील दोन‌ वर्षांपासून लाडू प्रसादाची विक्री बंद होती.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मंदिर सुरु झाले. पण लाडू प्रसादाची विक्री बंद होती. लाडू प्रसादाची विक्री सुरू करावी‌ अशी मागणी भाविकांनी‌ केली होती. त्यानंतर मंदिर समितीने आषाढी यात्रेच्या तोंडावर लाडू विक्री सुरू केली आहे.
नाशिक येथील यशोधरा महिला सहकारी औद्योगिक सहकारी संस्थेला  लाडू प्रसाद तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. आषाढीसाठी सुमारे आठ लाख बुंदी लाडू तर तीन लाख राजगिरा लाडू तयार करण्यात येणार आहेत. लाडू प्रसाद तयार करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. 140  ग्रॅम वजनाचा बुंदी लाडू प्रसाद  20 रुपये तर 50 ग्रॅम वजनाचा  राजगिरा लाडू प्रसाद 10 रूपयांना मिळणार आहे. दोन वर्षांनंतर भाविकांना‌ लाडू प्रसाद मिळू लागल्याने भाविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ‌

विठूमाऊलीचे दर्शन आता 24 तास सुरु

तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर पंढरपूरमध्ये  एकादशीचा मोहत्त्सव साजरा होणार आहे. यंदाच्या वारीत विक्रमी वारकरी सामील झाल्याने भाविकांची गैरससोय टाळण्यासाठी  24 तास दर्शन (24 hours dharshan) व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करण्यात आले आहेत. आज मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूजेनंतर विठुरायाच्या पाठीला लोड तर रुक्मिणी मातेच्या पाठीला तक्क्या लावण्यात आला. चोवीस तास दर्शनाला उभे राहून देवाला शिणवटा जाणवू नये यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या पाठीला मऊ कापसाचा लोड आणि तक्क्या लावण्याची परंपरा आहे.  इतर वेळा विठुरायाच्या राजोपचाराला पहाटे 4 वाजल्यापासून सुरुवात होत असते. ती रात्री शेजारतीपर्यंत म्हणजे रात्री साडेअकरा वाजेपर्यंत चालते.त्यानंतर मंदिर बंद होत असते. आता देवाचा पलंग निघाल्यामुळं दिवसभरात सकाळी देवाचे स्नान नित्यपूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी एवढ्यासाठी दर्शन बंद राहणार असून, उरलेल्या सर्व वेळात दिवसरात्र  दर्शन घेता येणार आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें