Pariksha Pe Charcha : कॉपी, शॉर्ट कट आणि टाइम मॅनेजमेंट; ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये पंतप्रधान मोदी यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र काय?

| Updated on: Jan 27, 2023 | 12:25 PM

काम केलं नाही तर थकवा जाणवतो. काम केल्याने आनंद वाटला पाहिजे. टाइम मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचे आहे. कठिण विषयावर लक्ष द्या, असं सांगतानाच पेन, पेन्सिल घेऊन एक डायरी लिहा.

Pariksha Pe Charcha : कॉपी, शॉर्ट कट आणि टाइम मॅनेजमेंट; परीक्षा पे चर्चामध्ये पंतप्रधान मोदी यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र काय?
pm narendra modi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’द्वारे आज विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोदी यांनी विद्यार्थ्यांना शॉर्ट कट, कॉपीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. कठोर मेहनत करा. वेळेचं नियोजन करा आणि जो विषय कठिण वाटतो त्याच्या मागे हात धुवून लागा, असा कानमंत्रही मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर आयोजित या चर्चेवेळी मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद सााधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली.

तीस मार खान होऊ नका

तुम्ही लहानपणी कावळ्याची गोष्ट ऐकली असेल. काही लोक हार्ड वर्क करतात. काही लोक हार्डली हार्ड वर्क करतात. काही जण स्मार्टली हार्ड वर्क करतात. जे क्रीडा प्रकाराशी संबंधित असतात त्यांना कोणत्या मसलची गरज आहे, हे माहीत असतं. त्यामुळे तीस मार खान बनू नका. कठोर मेहनत करा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

तुमच्यातील ताकदच तुम्हाला पुढे नेईल

जे विद्यार्थी मेहनत करतात त्यांच्या आयुष्यात बदल होतोच. एखादा विद्यार्थी कॉपी करून तुमच्या पेक्षा दोनचार मार्क अधिकचे मिळवेलही. परंतु, तो कधीच तुमच्या आयुष्यात अडसर ठरणार नाही. तुमच्यातील ताकदच तुम्हाला पुढे घेऊन जाईल, असंही ते म्हणाले.

शॉर्ट कट वापरू नका

तुम्ही मेहनत करा. परीक्षा येतात आणि जातात. आपल्याला आयुष्य जगायचं आहे. आपल्या शॉर्टकटमध्ये जायचं नाही. जर कोणी शॉर्ट कटचा मार्ग अवलंबत असेल तर तुम्ही तुमच्यावर फोकस करा, असा सल्ला त्यांनी दिला.

कॉपी करू नका

कॉपी करण्यासाठी काही विद्यार्थी वेगवेगळे प्रयोग करतात. मात्र, त्याने फायदा होत नाही. तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. आज तुम्हाला प्रत्येक ठिकाणी परीक्षेला सामोरे जावं लागतं. कुठपर्यंत कॉपी कराल. कॉपी करून आज तुम्ही पुढे जाल. पण आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही, असंही ते म्हणाले.

तो विषय आधी वाचा

काम केलं नाही तर थकवा जाणवतो. काम केल्याने आनंद वाटला पाहिजे. टाइम मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचे आहे. कठिण विषयावर लक्ष द्या, असं सांगतानाच पेन, पेन्सिल घेऊन एक डायरी लिहा. तुमचा वेळ कुठे वाया गेला ते पाहा.

तुमच्या आवडत्या गोष्टीत तुमचा सर्वाधिक वेळ जातो, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. वाचण्याने माइंड फ्रेश होतो. त्यामुले तुम्हाला जो विषय आवडत नाही. तो विषय आधी वाचायला घ्या, असंही त्यांनी सांगितलं.