Maharashtra Live Updates : भाजपचे अद्वय हिरे यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश

| Updated on: Jan 28, 2023 | 6:34 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Live Updates : भाजपचे अद्वय हिरे यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश
Maharashtra Latest Breaking NewsImage Credit source: tv9 marathi

मुंबई: बीबीसी डॉक्युमेंट्रीचा वाद अजूनही थांबताना दिसत नाहीये. या प्रकरणावरून जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन केलंय. अभिनेते अन्नू कपूर यांची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 27 Jan 2023 09:47 PM (IST)

  अकोला : दोन युवकांचा बुडून मृत्यू

  अकोला जिल्ह्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू

  बार्शीटाकळी तालुक्यातल्या कान्हेरी येथील शेत शिवारात पोहण्यासाठी गेले होते

  पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापनच्या कार्यकर्त्यांनी बाहेर काढले दोन्ही मृतदेह

 • 27 Jan 2023 09:42 PM (IST)

  ऑनर किलिंग प्रकरण

  महिपाल पिंपरी येथील ऑनर किलिंग प्रकरण

  फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांना मिळाले मोठे यश

  मुलीच्या तोंडाचा जबडा आणि मांडीची हाडे सापडली

  पोलिसांच्या तपासला मिळणार गती

 • 27 Jan 2023 09:09 PM (IST)

  चंद्रकांत पाटील यांची पहाटेच्या शपथविधीवर प्रतिक्रिया

  काही प्रश्नांची उत्तर ही कधीच मिळत नसतात

  देवेंद्र फडणवीस हे मँच्यअर राजकारणी आहेत ते बोलत नाहीत

  ते जेव्हा पुस्तक लिहितील तेव्हा आम्हाला कळेल की नेमकं काय घडलं होतं

 • 27 Jan 2023 08:41 PM (IST)

  रासपचे महादेव जानकर यांचा भाजपवर थेट आरोप

  आम्ही आमदार निवडून आणतो आणी रामदास तडसांचा पक्ष पळवून नेतो , ठाकरेंचा पक्ष पळवून नेतो

  आम्ही भाजपात असतो तर मंत्री झालो असतो मात्र आता असा बंदोबस्त करू की आमच्या शिवाय सरकार बनताना विचार करावा लागेल

  माझा पक्ष आता राष्ट्रीय पक्ष बनणाय आहे मला मुंबईत घरं मिळालं, आता दिल्लीत पक्षाचं ऑफिस मिळणार आहे

  2024 ला मी 100 टक्के खासदार बनणार

  बारामती शहरानं फक्त माझ्यावर प्रेम केलं नाही आजूबाजूच्या लोकांनी खूप प्रेम केलं

  वसंत मोरेंच्या दीड वर्ष झालं पाठीमागे आहे

  त्यांचाही लहान पक्ष आहे एकच आमदार आहे आणि माझाही एकच आमदार आहे

  त्यामुळे मी त्यांच्या मागे आहे

  वसंत मोरेंनी आमदार बनावं, खासदार बनावं

  इम्तियाज जलील खासदार व्हावेत अशी माझी इच्छा होती

  पंकजा मुंडे आणि मी हेलिकॉप्टरने एकत्रित प्रवास करत होतो

  इम्तियाज जलील हुशार माणूस आहे

  तरुणांनो राजकारणात या लवकर मंत्री व्हायचं असेल तर छोट्या पक्षात ता

  महादेव जानकरांची पुण्यातील जाधवर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात तुफान फटकेबाजी

 • 27 Jan 2023 07:27 PM (IST)

  संजीव पलांडे तुरुंगातून बाहेर

  100 कोटी कथित वसुली प्रकरणात आरोपी संजीव पलांडे

  संजीव पालांडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने केला जामीन मंजूर

  संजीव पालांडे हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय

  या प्रकरणात CBI ने गुन्हा दाखल केला होता

  देशमुख यांना देण्यात आलेल्या अटी व शर्ती पलांडे यांनाही कायम

 • 27 Jan 2023 06:56 PM (IST)

  विधानसभा निवडणुकीच्या तारखांत बदल

  तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा बदलल्या

  निवडणूक आयोगाने तारखा बदलल्या

  त्रिपुरा आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला होणार मतदान

  मेघालयमध्ये 16 फेब्रुवारीला होणार मतदान

 • 27 Jan 2023 06:28 PM (IST)

  गौतम अदानी यांचे श्रीमंतांच्या यादीतील स्थान घसरले

  अमेरिकेच्या हिंडनबर्गच्या एका अहवालाने बसला हादरा

  श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी यांच्या स्थानात काही दिवसांपूर्वी घसरण

  हिंडनबर्गच्या अहवालानंतर चौथ्या स्थानावरुन ते सातव्या स्थानावर

  अदानी यांची संपत्ती 100 अब्ज डॉलरच्या खाली आल्याचा दावा

 • 27 Jan 2023 06:06 PM (IST)

  नेपाळचे गृहमंत्री रबी लामिछाने यांची पदावरून हकालपट्टी

  नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने केली हकालपट्टी

  पासपोर्ट आणि नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून कारवाई

 • 27 Jan 2023 06:04 PM (IST)

  Entertainment News Live: 'पठाण'च्या यशावर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया

  'पठाण' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन दिवसांनी शाहरुखची प्रतिक्रिया

  चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत 200 कोटी रुपयांचा टप्पा पार केला, वाचा सविस्तर

 • 27 Jan 2023 05:02 PM (IST)

  सांगलीत शालेय पोषण आहारातून विषबाधा

  सांगलीतील ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा

  शालेय पोषण आहारातून झाली विषबाधा

  सर्व विद्यार्थी शासकीय रुग्णालयामध्ये

  मळमळ, उलटी आणि जुलाबचाही त्रास

 • 27 Jan 2023 04:43 PM (IST)

  Entertainment News Live: ‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी मोठा खुलासा

  वैशाली ठक्कर आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून कोर्टाच चलान दाखल

  आरोपी राहुल नवलानीने वैशालीचा अंघोळ करतानाच व्हिडीओ केला होता शूट

  वैशालीच्या होणाऱ्या पतीला पाठवला तिचा प्रायव्हेट व्हिडीओ, वाचा सविस्तर

 • 27 Jan 2023 04:40 PM (IST)

  स्वस्तात सोने खरेदीची संधी

  10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 57,062 रुपये

  आज चांदी झाली महाग, किंमत वधारली

  999 शुद्ध चांदीचा भाव 68,350 रुपये

  बुधवारी संध्याकाळी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,138 रुपये

  शुद्धतेच्या आधारावर सोने स्वस्त तर चांदीच्या किंमतीत उसळी

 • 27 Jan 2023 04:30 PM (IST)

  मालेगावातील भाजप नेते अद्वय हिरेंचा ठाकरे गटात प्रवेश

  ठाकरे गटात प्रवेश करताच हिरे यांचा भाजपवर हल्लाबोल

  पैसांसाठी बाप बदलणारी औलाद माझी नाही- अद्वय हिरे

 • 27 Jan 2023 04:03 PM (IST)

  पुणे

  पुण्यात येऊन राज्यपालांनी तोंड सांभाळून बोलावं म्हणेपर्यंत राज्यपालांचा दौरा रद्द झाल्याचं कळतंय

  हीच खरी शिवप्रेमींची दहशत आहे

  शिवद्रोही आणि महाराष्ट्र द्रोही राज्यपालांनी विद्यापीठात तोंड सांभाळून बोलावं

  संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांची टीका

 • 27 Jan 2023 03:29 PM (IST)

  वानलेसवाडी हायस्कुलमधील मुलांना झाली विषबाधा 

  वानलेसवाडी हायस्कुलमधील मुलाना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार

  हायस्कुलमध्ये दिलेल्या डाळ-भातातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज

  5 वी ते 7 वी पर्यतची ही सर्व मुले

  मुलांना मळमळ, उलटी, पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास

  सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 32 विद्यार्थी उपचारासाठी दाखल

  शालेय पोषण आहारमधून झाली विषबाधा

 • 27 Jan 2023 03:04 PM (IST)

  IND vs NZ 1st T20 : विराटच्या जागी 3 नंबरवर उतरणार खतरनाक बॅट्समन, काही चेंडूत फिरवू शकतो मॅच

  विराटच्या जागी 3 नंबरवर उतरणारा खतरनाक बॅट्समन कोण? वाचा सविस्तर....

 • 27 Jan 2023 02:58 PM (IST)

  गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी 1262 पानी चार्जशीट दाखल

  ओरेवा ग्रुपच्या जयसुख पटेल यांचा चार्जशीटमध्ये आरोपी म्हणून उल्लेख

  या दुर्घटनेत 134 जणांचा झाला होता मृत्यू

 • 27 Jan 2023 02:55 PM (IST)

  National News Live: आंध्रप्रदेशमधील कुप्पमजवळ अभिनेता तारका रत्न पडला बेशुद्ध

  टीडीपी नेते नारा लोकेश यांच्या 'युवा गलम' पदयात्रेदरम्यान थकल्यामुळे अभिनेता पडला बेशुद्ध

  अभिनेत्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू

 • 27 Jan 2023 02:50 PM (IST)

  Entertainment News Live: 'इमर्जन्सी' चित्रपटासाठी कंगना रनौतने गहाण ठेवली संपत्ती

  'इमर्जन्सी' या चित्रपटासाठी घर, कार्यलय गहाण ठेवल्याचा अभिनेत्री कंगना रनौतचा खुलासा

  चित्रपटात कंगना साकारतेय दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका, वाचा सविस्तर..

 • 27 Jan 2023 02:25 PM (IST)

  ४०० कोटींचा घोटाळा, पिंपरी चिंचवडमध्ये ईडीची छापेमारी

  पिंपरी चिंचवडमध्ये ईडीची छापेमारी

  सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्षांकडे छापे

  अमर मूलचंदानीसह आणखी काही ठिकाणी छापा टाकली

  400 कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याचं आलं होतं समोर

 • 27 Jan 2023 02:24 PM (IST)

  Sania Mirza : टेनिसमधून सन्यास घेतल्यानंतर सानिया मिर्झा कुठे, कोणासोबत राहणार? जाणून घ्या

  Sania Mirza : सानिया मिर्झा शुक्रवारी आपल्या करिअरमधील शेवटचा ग्रँड स्लॅम सामना खेळली. वाचा सविस्तर....

 • 27 Jan 2023 02:23 PM (IST)

  डेब्यु मॅचमधल्या हॅट्ट्रिकमुळे रातोरात स्टार बनला, पण 3 मॅचमध्येच संपलं करिअर

  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त डेब्यु केला. त्याच्याकडे भविष्य म्हणून पाहिलं जायचं. पण लॉकडाऊनमधल्या चुकीमुळे करिअर संपलं. वाचा सविस्तर....

 • 27 Jan 2023 02:23 PM (IST)

  Axar Patel च्या लग्नाचा VIDEO व्हायरल, अग्निला साक्षी मानून मेहाला बनवलं जीवनसाथी

  कुठे झालं लग्न? कोण आहे मेहा पटेल? वाचा सविस्तर...

 • 27 Jan 2023 02:22 PM (IST)

  70 वर्षाच्या सासऱ्याचा तरुण सूनेवर जीव जडला, मग दोघांच्या निर्णयाने सगळेच चक्रावले

  सासरा आणि सूनेच्या वयात थोडंथोडक नव्हे, तब्बल 42 वर्षांच अंतर आहे. भारतातल्या या घटनेची सर्वत्र चर्चा. वाचा सविस्तर....

 • 27 Jan 2023 02:14 PM (IST)

  पिंपरी चिंचवडमध्ये सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानींसह आणखी काही ठिकाणी ईडीचे छापे

  मूलचंदानींसह संचालकांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे 124 कर्ज वाटप केल्याचा आणि यातून 400 कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं

  पिंपरी चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी अमर मूलचंदानींसह पाच जणांना अटक ही केली होती

  काही महिन्यांपूर्वी मूलचंदानी जामिनावर बाहेर आले, त्यानंतर आज ईडीने छापा टाकला

  आरबीआयने प्रशासक नेमलेल्या या बँकेत हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी अडकून आहेत

 • 27 Jan 2023 12:30 PM (IST)

  Entertainment Update : २०० कोटी रुपये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी वादाच्या भावऱ्यात अडकलेल्या जॅकलीन फर्नांडिज हिने न्यायालयाकडे केली अशा मागणी

  मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुकेश चंद्रशेखर याच्यासोबतच जॅकलीन फर्नांडिज हिच्या अडचणीत वाढ?

  सुकेश चंद्रशेखर प्रकरण जॅकलीन फर्नांडिज हिला पडले महागात ; न्यायालयाने सुनावला मोठा निर्णय... वाचा सविस्तर

 • 27 Jan 2023 11:24 AM (IST)

  Aurangabad Live- आनंद दिघे यांना औरंगाबादेत अभिवादन

  सूतगिरणी चौकात आनंद दिघे यांना अभिवादन

  पालकमंत्री संदीपान भुमरे आणि आमदार संजय शिरसाठ उपस्थित

  शेकडो शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित

 • 27 Jan 2023 11:21 AM (IST)

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परीक्षा पे चर्चा

  पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत

  दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत

  परीक्षेला जाण्यापूर्वी काय तयारी करावी, मानसिक स्वास्थ कसं चांगलं ठेवावं, यावर मार्गदर्शन करत आहेत

 • 27 Jan 2023 10:55 AM (IST)

  IND vs NZ: टीम इंडियात 4 फास्ट बॉलर, जागा फक्त 3, हार्दिक कोणाला संधी देणार?

  India vs New Zealand:  आज न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या T20 सामन्यासाठी हार्दिक पंड्या तीन वेगवान बॉलर्सना टीममध्ये संधी देऊ शकतो. वाचा सविस्तर.....

 • 27 Jan 2023 10:53 AM (IST)

  Sania mirza : अरेरे, सानिया मिर्झाच अखेरच स्वप्न अपूर्ण

  Sania mirza : भारताची स्टार टेनिस प्लेयर सानिया मिर्झाच अखेरच स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. वाचा सविस्तर...

 • 27 Jan 2023 10:52 AM (IST)

  KL Rahul : लग्नाच्या 3 दिवसानंतर केएल राहुलने केलं पहिलं वजनदार काम, VIDEO

  KL Rahul : केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाला अवघे 3 दिवस झालेत. वाचा सविस्तर...

 • 27 Jan 2023 10:50 AM (IST)

  आता दक्षिण आफ्रीकेतून भारतात येणार चित्ते

  - भारताने केला दक्षिण आफ्रीकेशी करार, रॉयटरचे वृत्त

  - गेल्यावर्षी नामिबियातून आणले होते आठ चित्ते

  - येत्या फेब्रुवारी महिन्यात एक डझन चित्त्यांची भारतात एन्ट्री होणार

 • 27 Jan 2023 10:37 AM (IST)

  कसबा पेठ पोटनिवडणूकीसाठी भाजपची आज महाबैठक

  पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संध्याकाळी 7 वाजता पार पडणार बैठक,

  पोटनिवडणूकीच्या तयारीसाठी बैठकीचे आयोजन,

  बैठकीला शहरातील भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार.

 • 27 Jan 2023 10:24 AM (IST)

  गौतम अदानी समूहात गुंतवणुकीची मोठी संधी

  अदानी एंटरप्राईजेसचा FPO आजपासून बाजारात

  फॉलो ऑन पब्लिक ऑफरमध्ये गुंतवणुकीची संधी

  31 जानेवारी 2023 पर्यंत बोली लावू शकाल

  FPO मधून 20,000 कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य

 • 27 Jan 2023 10:18 AM (IST)

  Entertainment Update : शाहरुख खान स्टारर 'पठाण' सिनेमाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे...

  पठाण सिनेमाला प्रेक्षकांनी घेतलं डोक्यावर; बॉक्स ऑफिसवर सिनेमा करतोय कोट्यवधींची कमाई

  अभिनेता शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा पदार्पण केल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला... वाचा सविस्तर

 • 27 Jan 2023 09:52 AM (IST)

  ठाकरे गट - वंचित बहुजन आघाडीच राज्यातील पहिलं एकत्रित आंदोलन आज कोल्हापुरात

  कोल्हापूर : दोन्ही पक्ष एकत्रितपणे करणार पालकमंत्री चलेजाव आंदोलन,

  शाहू समाधीस्थळी एकत्र येत करणार आंदोलन,

  दलित वस्त्यांच्या निधीला स्थगिती निषेधार्थ आंदोलन,

  दलित वस्त्यांच्या 39 कोटीच्या निधीला प्रशासकीय मंजुरी असतानाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय स्थगिती,

  काही दिवसापूर्वीच राज्यात ठाकरे गट आणि वंचित बहुजन ची झालीय आघाडी,

  राज्यातल्या आघाडी नंतर आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरातून.

 • 27 Jan 2023 09:02 AM (IST)

  छत्रपती संभाजीराजेंनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची घेतली भेट

  तेलंगणात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामावर चर्चा,

  छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चंद्रशेखर राव यांच्या मनात आदर,

  छत्रपती संभाजीराजे यांची प्रतिक्रिया.

 • 27 Jan 2023 09:00 AM (IST)

  पुणे जिल्ह्यात अवकाळी पाऊस

  शिरूर आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाऊस

  शेती पिकांना पावसाचा फटका

  पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढणार

 • 27 Jan 2023 08:51 AM (IST)

  आज पेट्रोल-डिझेलचा भाव काय

  कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी तफावत नाही

  मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर

  अहमदनगरमध्ये पेट्रोल 106.13 तर डिझेल 92.65 रुपये प्रति लिटर

  अकोल्यात पेट्रोल 106.73 आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर

  अमरावतीत 106.57 तर डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर

  औरंगाबाद 107.40 पेट्रोल आणि डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर

  नागपूरमध्ये पेट्रोल 106.63 तर डिझेल 93.16 रुपये प्रति लिटर

  नांदेडमध्ये पेट्रोल 108.59 तर डिझेल 95.05 रुपये प्रति लिटर

  जळगावमध्ये पेट्रोल 106.11 आणि डिझेल 92.64 रुपये प्रति लिटर

  नाशिकमध्ये पेट्रोल 106.51 आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

  लातूरमध्ये पेट्रोल 107.59 तर डिझेल 94.07 रुपये प्रति लिटर

  कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.58 आणि डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर

  पुण्यात पेट्रोलचा भाव 106.38 आणि डिझेल 92.89 रुपये प्रति लिटर

  सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.60 रुपये तर डिझेल 93.12 रुपये प्रति लिटर

 • 27 Jan 2023 08:35 AM (IST)

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर 

  राज ठाकरे पुण्यात खाजगी कार्यक्रमांना लावणार हजेरी

  - पुणे दौऱ्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात मनसेची भूमिका ठरण्याची शक्यता

  - कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मनसे तटस्थ रहाण्याची शक्यता?

  - राज ठाकरे आज दुपारपर्यंत पुण्यात दाखल होणार..

 • 27 Jan 2023 08:28 AM (IST)

  टीम इंडियात पुन्हा 'शुभमंगल सावधान', केएल राहुलनंतर आणखी एक क्रिकेटपटू विवाहबद्ध

  राहुल 23 जानेवारीला आणि टीम इंडियाचा दुसरा स्टार 26 जानेवारीला विवाहबद्ध झाला. वाचा सविस्तर....

 • 27 Jan 2023 08:27 AM (IST)

  IND vs NZ 1st T20 : हार्दिकने एका खेळाडूच मन मोडलं, सरळ सांगितलं त्याला नाही मिळणार संधी

  IND vs NZ 1st T20 : आज टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये पहिला T20 सामना होणार आहे. वाचा सविस्तर....

 • 27 Jan 2023 08:09 AM (IST)

  राज्यात होणार 4479 तालाठ्यांची भरती..

  औरंगाबाद ब्रेकिंग :-

  राज्यात होणार 4479 तालाठ्यांची भरती..

  औरंगाबाद जिल्ह्याला मिळणार 117 तलाठी आणि 19 मंडळ अधिकारी..

  तब्बल 4997 पदांची सरळ सेवेतून होणार भरती..

  मराठवाड्यातील 602 तलाठी आणि 105 मंडळ अधिकाऱ्यांची पदे समाविष्ट..

  शासनाच्या विविध कामांची आणि योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असल्याने तलाठ्यांवर अतिरिक्त भार..

  सदर भरतीमुळे अनेकांच्या बढतीचे मार्ग झाला मोकळा..

 • 27 Jan 2023 08:08 AM (IST)

  Entertainment update : 'पठाण' सिनेमाने रचला अनोखा विक्रम ; ३२ वर्षांनंतर काश्मीरमध्ये घडली अशी गोष्ट

  पठाण सिनेमाने काश्मीरमध्ये रचला अनोखा विक्रम

  ३२ वर्षांनंतर काश्मीर खोऱ्यांमध्ये असं काय घडलं ज्यामुळे अनेकांनी मानले शाहरुख खान याचे आभार... वाचा सविस्तर

 • 27 Jan 2023 08:03 AM (IST)

  दिलासादायक बातमी, यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही!

  राज्यातील धरणांमध्ये सध्या 76 टक्के पाणीसाठा

  राज्यातील धरणात उन्हाळ्यात पुरेल एवढा पाणीसाठा

  गेल्यावर्षीच्या तुलनेत 4 टक्के पाणीसाठा कमी, पण चिंता नाही

  औरंगाबाद आणि नाशिक विभागातील धरणांमध्ये 79 टक्के पाणीसाठा

  कोकण 73, अमरावती 72 तर नागपूर विभागात 70 टक्के पाणीसाठा

  पुणे विभागातील धरणांमध्ये 76 टक्के पाणीसाठा

  लघू, मध्यम आणि मोठ्या धरणात पुरेसा पाणीसाठा

 • 27 Jan 2023 07:55 AM (IST)

  बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार तर दोन बकऱ्या गंभीर जखमी

  - बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार तर दोन बकऱ्या गंभीर जखमी.

  - लाखणी तालुक्यातील गडपेंढरी येथील घटना.

  - बिबट्याने गोठ्यात शिरून पाळीव जनावरांवर हल्ला करत यात दोन शेळ्या जागीच ठार केल्यातर एक शेळी जंगलात नेऊन ओढून नेत ठार केल्याची घटनामध्यरात्रीच्या सुमारास घड़ली.

  - घटनेची माहीती वनविभागाला देण्यात आली असून वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी पोहचत पंचनामा केला.

  - मात्र सातत्याने अश्या घटना घडत असून गावकऱ्यांनी त्या बिबट्या बंदोबस्त करावा व पीडित पशुपालकाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

 • 27 Jan 2023 07:53 AM (IST)

  नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचं सावट!

  - नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचं सावट!
  - जिल्हा परिषदेच्या कृती आराखड्यात २१७ नविन बोअरवेल प्रस्तावीत
  - दोन वर्षानंतर पहिल्यांदाच २१७ नविन बोअरवेल प्रस्तावीत
  - तीन टप्प्यात २९ कोटी १२ लाख रुपयांचा आराखडा तयार
  - यंदा नागपूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनंही पाणीटंचाईचं सावट
 • 27 Jan 2023 07:52 AM (IST)

   दिलासादायक बातमी, यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही!

   दिलासादायक बातमी, यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही!
  - *राज्यातील धरणांमध्ये सध्या ७६ टक्के पाणीसाठा*
  - *राज्यातील धरणात उन्हाळ्यात पुरेल येवढा पाणीसाठा*
  - गेल्यावर्षीच्या तुलनेत ४ टक्के पाणीसाठा कमी, पण चिंता नाही
  - औरंगाबाद आणि नाशिक विभागातील धरणांमध्ये ७९ टक्के पाणीसाठा
  - कोकण ७३, अमरावती ७२ तर नागपूर विभागात ७० टक्के पाणीसाठा
  - पुणे विभागातील धरणांमध्ये ७६ टक्के पाणीसाठा
  - लघू, मध्यम आणि मोठ्या धरणात पुरेसा पाणीसाठा
 • 27 Jan 2023 07:42 AM (IST)

  आदिवासी उत्पादनांचा भरला 'आदिहाट'

  नाशिक : आदिवासी विकास विभागाकडून कायमस्वरूपी बाजारपेठ आणि रोजगारासाठी 'आदिहाट' उपक्रम सुरू,

  आदिवासी संस्कृतीशी निगडित वस्तू, धान्य, खाद्यपदार्थ यांचे दालन,

  नाशिकरोड रेल्वेस्थानक, ठक्कर बाजार बस स्टॉप, महामार्ग बस स्टॉप येथे उपक्रम सुरू.

 • 27 Jan 2023 07:41 AM (IST)

  महापालिका आणि जलसंपदा यांच्यातील 200 कोटींचा वाद आता शासनाच्या कोर्टात

  नाशिक : पुनर्स्थापना खर्चाचे 138 कोटी आणि दंडनीय रक्कम 60 कोटी अशा 200 कोटी रुपयांच्या वादाबाबत दोन्ही यंत्रणेचे एकमत नाही,

  यासंदर्भात राज्य शासनच घेणार निर्णय,

  महापालिका आणि जलसंपदा यांच्यातील अकरा वर्षांपासून रखडलेला पाणी करार मागच्या महिन्यात लागला मार्गी.

 • 27 Jan 2023 07:40 AM (IST)

  महापालिका बीओटी विकासाचा फंडा राबवण्याची शक्यता

  नाशिक : खासगीकरणाच्या माध्यमातून आर्थिक स्थिती चांगली करण्याचा प्रयत्न,

  22 भूखंडांचा बीओटीच्या धर्तीवर विकास करण्याच्या हालचाली सुरू,

  यासाठी अभ्यास करून प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू.

 • 27 Jan 2023 07:21 AM (IST)

  26 जानेवारी रोजी नागपूर मेट्रोची प्रवाशीसंख्या 2 लाखांवर

  प्रजासत्ताक दिनी नागपूरकरांची मेट्रो प्रवासाला पसंती

  प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपूर मेट्रोतर्फे विविध कार्यक्रमाचं आयोजन

  मेट्रोच्या सीताबर्डी, झिरो माईल, खापरी स्थानकांवर कार्यक्रमाचे आयोजन केल्याने वाढली प्रवाशी संख्या

  1 जानेवारी 2023 ला एका दिवसांत 2.20 लाख लोकांनी केला होता नागपूर मेट्रोचा प्रवास

 • 27 Jan 2023 07:19 AM (IST)

  अमरावती शहरात वर्षभरात तबल 400 पेक्षा अधिक दुचाकी गाड्यांची चोरी

  अमरावती शहरात चोरट्याचा हैदोस कायम, 400 पैकी केवळ 93 प्रकरणाचा उलगडा

  अमरावती शहरातील जैन कॉम्प्लेक्स, राठी नगर, तापडिया मॉल, राजपेठ, जुना कॉटन मार्केट परिसरातून वाहनांची चोरी

  आटो रिक्षा, कार चोरीच्या देखील अमरावती शहरात घडल्या घटना

 • 27 Jan 2023 07:13 AM (IST)

  अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये आजपासून तीन दिवसीय भव्य राज्यस्तरीय महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ

  प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर आणि भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार दीपक हुड्डा लावणार हजेरी

  आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडून कबड्डी स्पर्धेचे आयोजन

  राज्यभरातील नामांकित महिला व पुरुषांचे कबड्डी संघ होणार सहभागी

 • 27 Jan 2023 07:07 AM (IST)

  स्पा सेंटरच्या आडून पिंपरी चिंचवडमध्ये वेश्याव्यवसाय, पोलिसांची मोठी कारवाई

  पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड च्या उच्चभ्रू वसाहत पिंपळे सौदागर येथील एका स्पा सेंटर वर अनैतिक मानवी विभागाच्या पोलिसांनी कारवाई करत वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार महिलांची सुटका केलीय,

  आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार बनावट ग्राहक पाठवू ही खात्री करत ही कारवाई केली,

  या प्रकरणी दोघां विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय,

  या कारवाई मधह्ये 34 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

 • 27 Jan 2023 06:38 AM (IST)

  पुण्यात बेल्हे जेजुरी महामार्गावरील लोणी येथे मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी

  भक्ष्याच्या शोधासाठी बाहेर पडलेल्या बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने बिबट्या गंभीर जखमी झाला आहे

  या बिबट्याला उपचारासाठी माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात आले आहे

  गेल्या काही दिवसापासून बिबट्याच्या अपघातात वाढ होत असून अशा अपघातात बिबट्यांचा मृत्यू आणि जखमी होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ

  प्राणिमित्रांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

 • 27 Jan 2023 06:36 AM (IST)

  पुण्यात आजपासून सीएनजी पंप राहणार बंद

  सीएनजी पंप चालकांनी पुकारला बेमुदत संप

  टोरंट कंपनीने नफ्याचा हिस्सा न दिल्याने पुणे ग्रामीणमधील सर्व पंप आजपासून बेमुदत काळासाठी राहणार बंद

  शहरातील एमएनजीएलची सेवा मात्र नेहमीप्रमाणे राहणार सुरू

  पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वच सीएनजी पंप बेमुदत काळासाठी बंद ठेवण्याचा चालकांचा इशारा

  पेट्रोल डिझेल असोसिएशन पदाधिकाऱ्यांची माहिती

 • 27 Jan 2023 06:33 AM (IST)

  अंबरनाथमध्ये विजेच्या धक्क्याने महिलेचा जागीच मृत्यू, एक जखमी

  अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडच्या म्हात्रे गोट फार्ममधील घटना

  मंदा मुकने असं मृत महिलेचं नाव

  जखमीवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू

  हिललाईन पोलिसांनी मृतदेह घेतला ताब्यात

  शवविच्छेदनासाठी मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल

 • 27 Jan 2023 06:30 AM (IST)

  मुंबईत सायन-पनवेल महामार्गावर ट्रक आणि कारची भीषण धडक

  या धडकेनंतर ट्रकने कारला सुमारे 200 मीटरपर्यंत खेचत नेलं

  त्यानंतर ट्रकचालक ट्रक थांबवून पळून गेला

  त्यामुळे बराच वेळ वाहतूककोंडी झाली होती

  या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही

Published On - Jan 27,2023 6:26 AM

Follow us
तुकाराम मुंडे यांची बदली अमेरिका किंवा चीनला करा, कुणाची सरकारवर टीका
तुकाराम मुंडे यांची बदली अमेरिका किंवा चीनला करा, कुणाची सरकारवर टीका.
'छगन भुजबळ यांची पक्षात गळचेपी, सरकारमध्ये ते राहणार नाही', कुणचा दावा
'छगन भुजबळ यांची पक्षात गळचेपी, सरकारमध्ये ते राहणार नाही', कुणचा दावा.
वसईतील घटनेची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या
वसईतील घटनेची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या.
वसईत माणुसकीची हत्या, तरुणीवर लोखंडी पान्याने वार, बघणारे बघत राहिले..
वसईत माणुसकीची हत्या, तरुणीवर लोखंडी पान्याने वार, बघणारे बघत राहिले...
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी? रात्री शिंदे फडणवीसांमध्ये काय चर्चा
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी? रात्री शिंदे फडणवीसांमध्ये काय चर्चा.
पुण्यात ओबीसी संघटनांचं आंदोलन, थेट सगेसोयरे 'जीआर'ची होळी
पुण्यात ओबीसी संघटनांचं आंदोलन, थेट सगेसोयरे 'जीआर'ची होळी.
बाळासाहेबांच्या स्मारकाचं लवकरच लोकार्पण, जनतेसाठी कधी होणार खुलं?
बाळासाहेबांच्या स्मारकाचं लवकरच लोकार्पण, जनतेसाठी कधी होणार खुलं?.
देवाने मला संघर्ष.., पंकजा मुंडेंची पुन्हा कार्यकर्त्यांना भावनिक साद
देवाने मला संघर्ष.., पंकजा मुंडेंची पुन्हा कार्यकर्त्यांना भावनिक साद.
'मरे'च्या प्रवाशांसाठी खुशखबर, आता वेळेत ऑफिसला पोहोचता येणार कारण....
'मरे'च्या प्रवाशांसाठी खुशखबर, आता वेळेत ऑफिसला पोहोचता येणार कारण.....
राज्यात 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील 24 तास मुंबईसाठी कसे?
राज्यात 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील 24 तास मुंबईसाठी कसे?.