Axar Patel Married To Meha Patel: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर अक्षर पटेल विवाह बंधनात अडकलाय. अक्षरने गर्लफ्रेंड मेहा पटेलला आयुष्यभराची जोडीदार म्हणून निवडलय. मागच्यावर्षी दोघांचा साखरपुडा झाला होता. अक्षर बँड-बाजासह वरात घेऊन पोहोचला होता. आता दोघे विवाहबद्ध होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अक्षरची बायको मेहा पटेल पेशाने न्यूट्रिशनिस्ट आणि डायटीशियन आहे. सोशल मीडियावर सुद्धा ती सक्रिय असते. तिने शेअर केलेले फोटो नेहमीच चाहत्यांच्या पसंतीला उतरतात. अक्षर नेहाच्या गळ्यात वरमाला घालत असतानाचा, व्हिडिओ समोर आलाय. मेहाने सफेर रंगाचा लहंगा परिधान केला होता. अक्षरने सुद्धा सफेद रंगाची शेरवानी घातली होती. दोघेही खूप सुंदर दिसत होते.