सिडनी – माजी नंबर वन डबल्स टेनिसपटू सानिया मिर्झा आपल्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. ऑस्ट्रेलियन ओपन टुर्नामेंटमध्ये मिक्स्ड डब्ल्सच्या फायनलमधील पराभवाने तिने ग्रँड स्लॅम स्पर्धेचा निरोप घेतला. आता पुढच्या महिन्यात ती दुबईमध्ये अखेरची WTA 1000 टुर्नामेंट खेळण्यासाठी उतरणार आहे. दुबईमध्ये ती टेनिस करिअरमधील शेवटचा सामना खेळणार आहे. टेनिसमधून निवृत्ती घेतल्यानंतर सानिया काय करणार? कुठे रहाणार? नवरा शोएब मलिकसोबत दुबईमध्येच राहणार की, आई-वडिलांसोबत भारतात रहाणार? असे प्रश्न काहींच्या मनात आहेत.