AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ 1st T20 : हार्दिकने एका खेळाडूच मन मोडलं, सरळ सांगितलं त्याला नाही मिळणार संधी

IND vs NZ 1st T20 : आज संध्याकाळी 7 वाजता रांचीच्या JSCA क्रिकेट स्टेडियममध्ये सीरीजमधील पहिला टी 20 सामना होईल. या मॅचच्या एकदिवस आधी काल 26 जानेवारीला झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हार्दिक पंड्याने एका खेळाडूच मन मोडलं.

IND vs NZ 1st T20 : हार्दिकने एका खेळाडूच मन मोडलं, सरळ सांगितलं त्याला नाही मिळणार संधी
Image Credit source: Hardik Pandya Twitter
| Updated on: Jan 27, 2023 | 7:40 AM
Share

IND vs NZ, 1st T20 : वनडे सीरीजमध्ये क्लीन स्वीप केल्यानंतर टीम इंडिया आजपासून टी 20 सीरीज खेळणार आहे. वनडे प्रमाणेच T20 मध्ये 3-0 ने मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. आज संध्याकाळी 7 वाजता रांचीच्या JSCA क्रिकेट स्टेडियममध्ये सीरीजमधील पहिला टी 20 सामना होईल. या मॅचच्या एकदिवस आधी काल 26 जानेवारीला झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हार्दिक पंड्याने एका खेळाडूच मन मोडलं. रांचीमध्ये न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या T20 सामन्यात त्याला संधी मिळणार नाही, असं हार्दिक पंड्याने सरळ पत्रकार परिषदेत सांगितलं.

हार्दिक काय म्हणाला?

न्यूझीलंड विरुद्ध T20 सीरीमध्ये हार्दिक पंड्याकडे टीम इंडियाच नेतृत्व आहे. रांचीमध्ये होणाऱ्या पहिल्या T20 सामन्याआधी हार्दिक पंड्याने काल पत्रकार परिषदेत, पृथ्वी शॉ ला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार नाही, हे स्पष्ट केलं. सध्या फॉर्ममध्ये असलेला शुभमन गिल आणि इशान किशची जोडी न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात सलामीला येईल, असं हार्दिकने गुरुवारी सांगितलं. शुभमन गिलने नुकत्याच संपलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये दोन शतकं झळकवली आहेत.

‘तो’ टीमच्या प्लानचा भाग

शुभमन गिल सध्या ज्या पद्धतीची फलंदाजी करतोय, ते पाहता पृथ्वी शॉ ला अजून वाट पहावी लागेल, असं हार्दिक पंड्या म्हणाला. शुभमन गिलने मागच्या चार सामन्यात एका डबल सेंच्युरीसह तीन शतकं झळकवली आहेत. शुभमन गिलने चांगलं प्रदर्शन केलय. न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरीजमध्ये तो डावाची सुरुवात करेल. शुभमन गिल सध्या जी फलंदाजी करतोय, ते पाहता तो टीम इंडियाच्या योजनेचा भाग आहे. न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या वनडेमध्ये मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली. त्यावेळी हार्दिक पंड्याने नव्या चेंडूने जबाबदारी संभाळली. न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात हार्दिक पुन्हा एकदा नवा चेंडू हाताळेल. एमएस धोनी बरोबर हार्दिकची भेट

“नव्या चेंडूने बॉलिंग करायला मला मजा येते. मी अनेक वर्षांपासून नेटमध्ये नव्या चेंडूने गोलंदाजी करतोय” असं हार्दिक म्हणाला. माजी कर्णधार एमएस धोनी बरोबर झालेल्या भेटीबद्दल हार्दिक म्हणाला की, “माही भाई इथेच आहे. त्यामुळे त्याला भेटण्याची संधी मिळाली. त्याला भेटण्यासाठी आम्ही हॉटेल बाहेरही जाऊ शकतो. मागच्या एक महिन्यापासून आम्ही जितके खेळतोय, त्यात एका हॉटेलवरुन दुसऱ्या हॉटेलवर जातोय” “जेव्हा कधी मी धोनीला भेटतो, तेव्हा क्रिकेटपेक्षा आयुष्याबद्दल जास्त बोलतो. मी त्याच्याकडून बरच काही शिकलोय” असं हार्दिक म्हणाला.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...