AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

parliament attack | भगतसिंग नावाचा ग्रुप बनवला, वर्षभरापासून संपर्कात, असा घडवला संसदेवर हल्ला

parliament attack | संसद भवन घटनेबाबत ताब्यात घेण्यात आलेल्या चार जणांची अद्याप चौकशी सुरू आहे. या प्रकरणात पाच आरोपीस अटक झाली आहे. सहाव्या आरोपीचा शोध सुरु आहे. आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आले. त्यांनी एक ग्रुप बनवला आणि हल्ल्याचा कट रचला.

parliament attack | भगतसिंग नावाचा ग्रुप बनवला, वर्षभरापासून संपर्कात, असा घडवला संसदेवर हल्ला
parliament attack
| Updated on: Dec 14, 2023 | 8:06 AM
Share

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली, 14 डिसेंबर | संसदेवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यास बुधवारी १३ डिसेंबर रोजी २२ वर्ष पूर्ण झाली. त्याच दिवशी पुन्हा संसदेची सुरक्षा भंग करुन हल्ला करण्यात आला. आता हल्ला करणारे युवक सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी घुसले. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सहावा आरोपी फरार आहे. लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारणारा आरोपी सागर शर्मा हा लखनऊचा तर मनोरंजन हा कर्नाटकातील बेंगळुरूचा आहे. तसेच संसदेबाहेर अटक करण्यात आलेली महिला नीलम ही हरियाणाच्या जिंद येथील रहिवासी आहेत. २५ वर्षीय अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. हे चौघेही आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले. एक ते दीड वर्षांपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी फेकबुकवर भगतसिंग नावाचा ग्रुप तयार केला होता.

सोशल मीडियात विचार जुळले, बनवला ग्रुप

संशयित आरोपीपैकी 4 जण 1 ते दीड वर्षांपूर्वी फेसबुकवर एकमेकांना भेटले. त्यांनी भगतसिंग नावाचा ग्रुप तयार केला. त्या माध्यमातून ते एकामेकांच्या संपर्कात राहत होते. त्यांचे विचार एकमेकांशी जुळले होते. या प्रकरणात पाचवा आरोपी विकी शर्मा याला पोलिसांनी अटक केली आहे. पण सहावा आरोपी ललित झा अजूनही फरार आहे. मनोरंजन, सागर शर्मा, नीलम आझाद आणि अमोल शिंदे हे 3 दिवसांपूर्वी दिल्लीत आले. वेगवेगळ्या वेळेत ते दिल्लीत दाखल झाले.

आरोपींनी का केला हल्ला

मनोरंजन, सागर शर्मा, नीलम आझाद आणि अमोल शिंदे यांनी केंद्र सरकारने मणिपूर घटना, शेतकरी आंदोलन, महागाई याबाबत घेतलेली भूमिका पटली नाही. यामुळे त्यांनी संसदेत घुसण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांची चौकशी करणाऱ्या यंत्रणेकडून देण्यात आली.

या कलमांनुसार गुन्हा दाखल

संसद हल्ल्यातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयपीसी कलम 452, 120-B आणि UAPA यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.