AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संसदेच्या सुरक्षा भंगाचे प्रकरण: पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्र्यांना काय दिल्या सूचना

संसदेच्या सुरक्षेतील मोठी चूक झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून उत्तराची मागणी केली आहे. दोन्ही सभागृहात यावरुन प्रचंड गोंधळ झाला. सभागृहाची सभ्यता मोडल्याने १४ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना काय सूचना दिल्यात पाहा.

संसदेच्या सुरक्षा भंगाचे प्रकरण: पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्र्यांना काय दिल्या सूचना
modi
shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 14, 2023 | 8:24 PM
Share

नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेत झालेल्या मोठ्या चुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पंतरप्रधान मोदी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचे आणि त्यावर राजकारण करू नये असे निर्देश दिले आहे. आपण सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे असं ही ते म्हणाले आहेत.

विरोधी पक्षाने आज यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून उत्तर मागितले होते. दोन्ही सभागृहांमध्ये यावरुन गदारोळ झाला. त्यानंतर  14 खासदाराचे सभागृहात अवमान आणि अनादर केल्याबद्दल निलंबन करण्यात आले. टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.

सरकारने काय म्हटले?

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, “कालची घटना दुर्दैवी होती. लोकसभा सदस्यांच्या सुरक्षेतील ही गंभीर त्रुटी होती. हे आपण सर्व मान्य करतो. लोकसभा अध्यक्षांच्या सूचनेवरून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.

विरोधकांचा हल्लाबोल

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी राज्यसभेत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सुरक्षेत चूक ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं त्यांनी म्हटले होते. अमित शहा यांनी सभागृहात उत्तर द्यावे. असे त्यांनी म्हटले होते. केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले होते की, काँग्रेससह इतर पक्ष राजकारण करत आहेत. राजकारण करण्यापेक्षा देशाला एकात्मतेचा संदेश द्यायला हवा. यानंतर विरोधी आघाडी ‘इंडिया’ने सभागृहातून वॉकआउट केला.

लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन जणांनी बुधवारी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली होती. यादरम्यान दोघांनी डब्यातून पिवळा धूर पसरवला. काही खासदारांनी त्यांना धरलं. दुसरीकडे अमोल शिंदे आणि नीलम देवी यांनी संसद परिसराबाहेर कॅनमधून रंगीत धूर सोडला आणि ‘हुकूमशाही चालणार नाही’ अशा घोषणा दिल्या.

पोलीस काय म्हणाले?

सागर, मनोरंजन, अमोल, नीलम आणि विकी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचा दुसरा साथीदार ललित याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, सहाही जण एकमेकांना आधीच ओळखत होते आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी कट रचला होता.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?