AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी चर्चा, नंतर वाद आणि मग… इंडिगोच्या विमानातील धक्कादायक प्रकाराने एकच खळबळ

इंडिगो कंपनीच्या विमानामध्ये एका प्रवाशाने पायलटच्या थोबाडीत मारल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. विमानाचे उड्डाण वेळेवर न झाल्याने प्रवासी संतापले आणि त्यामुळेच ही घटना घडली. आरोपी प्रवाशाला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आधी चर्चा, नंतर वाद आणि मग... इंडिगोच्या विमानातील धक्कादायक प्रकाराने एकच खळबळ
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Jan 15, 2024 | 12:27 PM
Share

नवी दिल्ली | 15 जानेवारी 2024 : नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर धक्कादायक घटना घडली आहे. इंडिगो कंपनीच्या विमानामध्ये एका प्रवाशाने पायलटच्या थोबाडीत मारल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. विमानाचे उड्डाण वेळेवर न झाल्याने प्रवासी संतापले आणि त्यामुळेच ही घटना घडली. साहिल कटारिया असे आरोपी प्रवाशाचे नाव असून त्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी अधिक चौकशी करत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या विमानात हा धक्कादायक प्रकार घडला. दिल्ली विमानतळावरू गोव्यासाठी जाणाऱ्या विमानाच्या उड्डाणाला तब्बल १३ तास उशीर झाला. मात्र यामुळे प्रवाशांची बरीच गैरसोय झाली. कडाक्याच्या थंडीत एअरपोर्टवरच अडकून पडल्याने प्रवासी देखील खूप संतापले. त्यात संतापाच्या भरात साहिल कटारिया नावाच्या इसमाने इंडिगो विमानाच्या पायलटला थोबाडीत मारलीय. यामुळे एकच गदारोळ उडाला. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर साहिल याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलिस पुढील चौकशी करत आहेत.

इंडिगोच्या गोव्याला जाणाऱ्या विमानातील पायलट हा विमानाला उशीर झाल्यासंदर्भात माहिती देत असतानाच हा प्रकार घडला. त्यामुळे एक प्रवासी संतापला आणि उठून वाद घालू लागला. त्याने पायलटला मारहाणही केली. फ्लाइट टेक ऑफ करणार नसेल तर गेट तरी उघडा असे सांगत तो गोंधळ घालू लागला. एअर होस्टेसने त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. हे चुकीचं आहे, तुम्ही असं करू शकत नाही, असं सांगत तिने समवाजवण्याच्या प्रय्तन केला. पण तो संतापलेलाच होता. अखेर दिल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.