ना विदेशी गुंतवणूकदार, ना प्रायव्हेट जेट… बाबा रामदेव यांनी ‘राष्ट्र सेवे’च्या डीएनएतून पतंजलीचा वटवृक्ष वाढवला
पतंजली आयुर्वेद गुलाब शर्बत आणि इतर सरबतांमुळे चर्चेत आहे. कंपनी राष्ट्रसेवेला प्राधान्य देत असून, नफा भारतातच गुंतवते, शेअरहोल्डर्सना लाभांश देत नाही. शिक्षण, गौशाळा, योग केंद्र आणि आयुर्वेदिक उपचारांवर खर्च केला जातो. पारंपारिक आयुर्वेद आणि राष्ट्रसेवा हे पतंजलीचे मुख्य ध्येय आहेत.

पतंजली आयुर्वेद सध्या ‘गुलाब शर्बत’सह ‘बेल’ आणि ‘खस’च्या सरबतामुळे चर्चेत आहे. उन्हाळा वाढत चालल्याने सरबाताची मागणी वाढली आहे. पारंपारिक पद्धतीने तयार करण्यात आलेलं हे सरबत ग्राहकांना थंडावा देत आहे. पण सबरत बनवताना पतंजलीने राष्ट्र सेवेलाच सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या कंपनीच्या डीएनएमध्येच राष्ट्र सेवा ठासून भरली आहे.
पतंजली आयुर्वेदने आज हजारो कोटी रुपयांची एक आयुर्वेद आणि एफएमसीजी कंपनी बनवली आहे. ही कंपनी उभी करण्यासाठी परदेशी गुंतवणुकदाराचा पैसा वापरलेला नाही. तसेच कंपनीने मोठ्या अधिकाऱ्यांसाठी प्रायव्हेट जेटही खरेदी केलेलं नाही. यावरून पतंजलीच्या डीएनएमध्येच राष्ट्र सेवा असल्याचं अधोरेखित होत आहे.
देशाचा पैसा देशासाठी
पतंजली आयुर्वेदाच्या डीएनएमध्ये भरलेली राष्ट्र सेवा अशी आहे की कंपनी आपल्या शेअरहोल्डर्सला कोणताही डिव्हिडंट देत नाही. तर भारतात होणारी कमाई परत भारतातच गुंतवली जात आहे. त्यामुळेच पतंजलीने देशातील मोठमोठ्या एफएमसीजी कंपन्यांनाही टक्कर दिली आहे.
राष्ट्र आणि धर्म सेवा लक्ष्य
पतंजली आयुर्वेद आपल्या राष्ट्र सेवेचं कनेक्शन धर्म सेवेशी सांगतो. एकीकडे कंपनी आपल्या नफ्यातून गाव आणि वाड्या वस्तीतील शिक्षणाच्या प्रसारावर खर्च करत आहे. तर वैदिक आणि पारंपारिक ज्ञान पुढे नेण्यासाठी पतंजलीने गुरूकूलचीही स्थापना केली आहे. याशिवाय कंपनी मोठ्या प्रमाणावर देशातील गौशाळांना दान देऊन या गौशाळांचं संचलनही करत आहे.
कंपनीचा चेहरा असलेल्या रामदेव बाबांनी कुंभ मेळ्यात सेवा करतानाच गंगा सफाईसाठी योगदान दिलं होतं. मंदिरातही त्यांनी दानधर्म केला होता. तर कंपनीचा पैसा योग केंद्र, आयुर्वेदिक दवाखाने उघडणे आणि शेतकऱ्यांना ऑर्गेनिक शेती करण्यास मदत करण्यासाठी वापरला जात आहे.
