AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील लोक सर्वात जास्त खर्च ‘या’ दोन गोष्टींवर करतात, आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर

भारतीयांचा सर्वाधिक खर्च कशावर होतो? याचं उत्तर ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. आर्थिक वर्ष 2024 मध्ये औषधी आणि दारू या दोन गोष्टींवर भारतीय कुटुंबांनी सर्वाधिक खर्च केल्याचं समोर आलं आहे.

भारतातील लोक सर्वात जास्त खर्च 'या' दोन गोष्टींवर करतात, आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर
Image Credit source: Instagram
| Updated on: May 20, 2025 | 7:16 PM
Share

भारतीयांचा सर्वाधिक खर्च कशावर होतो? याचं उत्तर ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. आर्थिक वर्ष 2024 मध्ये औषधी आणि दारू या दोन गोष्टींवर भारतीय कुटुंबांनी सर्वाधिक खर्च केल्याचं समोर आलं आहे.  सरकारी आकड्यांनुसार औषध आणि दारू या दोन गोष्टींवर होणारा भारतीयांचा खर्च गेल्या 12 वर्षांपासून सातत्यानं वाढतच गेला आहे. दारू आणि तंबाखू या दोन गोष्टींवरील खर्च 2024 मध्ये 15.7 टक्क्यांनी वाढला आहे. 2012 पासून दारू आणि औषधांसाठी लागणाऱ्या खर्चात सातत्यानं वाढच होत असल्याचं समोर आलं आहे.

फक्त दारूच नाही तर गेल्या आर्थिक वर्षामध्ये भारतीयांनी औषधांवर आणि इतर आरोग्य साधनांवर देखील मोठा खर्च केल्याचं आकडेवारीमधून समोर आलं आहे, गेल्या बारा वर्षांमध्ये या दोन गोष्टींवर जेवढा खर्च झाला नव्हता तेवढा खर्च गेल्या वर्षी या दोन गोष्टींवर झाला आहे. गेल्या वर्षी औषध आणि दारूवरील खर्चामध्ये तब्बल 15.7 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर त्या आधीच्या आर्थिक वर्षात ही वाढ 7.2 टक्के एवढी होती. समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतीय कुटुंबांनी गेल्या आर्थिक वर्षांमध्ये आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केल्याचं समोर आलं आहे, ज्यामध्ये डॉक्टर विविध प्रकारच्या गोळ्या औषधी आणि इतर आरोग्याशी निगडीत सुविधांचा समावेश आहे. तसेच दारूवर देखील मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे, या दोन गोष्टींचा देशाच्या जीडीपीमध्ये देखील मोठा वाटा आहे.

2012 पासून ते 2025 पर्यंत दर वर्षी या दोन गोष्टींवर होणाऱ्या खर्चामध्ये सरासरी 0.5 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. 2024 मध्ये कपडे आणि बूट, चपला यांच्या खरेदीचं प्रमाण घटलं आहे, त्यांच्यावर होणारा खर्च कमी झाला आहे. मात्र दुसरीकडे दारूवर होणाऱ्या खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच गेल्यावर्षी भारतीयांनी हॉटलिंगवर देखील मोठ्या प्रमाणात खर्च केल्याचं समोर आलं आहे. दारू आणि आरोग्य या दोन गोष्टींवर गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं खर्च वाढत असल्याचं आकडेवारीमधून समोर आलं आहे.

Follow Us
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ