लॉकडाऊनमुळे मजुरांची गावाकडे धाव, घरात वेगळी रुम नसल्यानं झाडावर क्वारंटाईन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉक डाऊन घोषित करण्यात आला (People quarantine on tree west bengal)आहे.

लॉकडाऊनमुळे मजुरांची गावाकडे धाव, घरात वेगळी रुम नसल्यानं झाडावर क्वारंटाईन

कोलकाता (पश्चिम बंगाल) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉक डाऊन घोषित करण्यात आला (People quarantine on tree west bengal)आहे. त्यामुळे शहरात काम करणारे सर्व मजूर आपल्या गावी परतत आहेत. गावी परतणाऱ्या सर्वांना खबरदारी म्हणून क्वारंटाईन केले जात आहे. पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात चेन्नईवरुन परतलेल्या काही लोकांनी स्वत:ला एका झाडावर क्वारंटाईन केले (People quarantine on tree west bengal) आहे.

घरात सेल्फ आयसोलेशनसाठी वेगळी खोली नसल्याने त्यांनी थेट झाडावर स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे. शहरातून परतलेले सर्व लोक झाडावर खाट टाकून राहत आहेत. गावात येण्यापूर्वी सर्वांनी स्थानिक दवाखान्यात जाऊन तपासणी केली आहे. तेथील डॉक्टरांनी त्यांना 14 दिवस स्वत:ला क्वारंटाईन करण्यास सांगितले आहे.

शहरातून आलेले सर्व लोक घराच्या बाहेर झोपण्यास घाबरत होते. कारण बऱ्याचदा जंगली हत्ती गावात येतात. अशामध्ये त्यांना झाडावर राहण्याची कल्पना सुचली. त्यामुळे त्यांनी झाडावर खाट बांधून राहण्याचे ठरवले. त्यांना आता कोणत्या जंगली प्राण्याची भीती नाही. तसेच गावातील इतरांनाही कोरोनाची भीती नाही.

गावतील नागरिक आणि घरातील लोक त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करत आहेत. गावातील लोक जेवण झाडाखाली ठेवतात आणि निघून जातात. कामगार गावातील लोक निघून गेल्यावर खाली उतरुन जेवतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *