AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणी लुंगीत लपवली, कुणी खिशात दडवली, दारूचा ट्रक उलटताच… तळीरामांची दिवाळी… बाटल्या पळवण्यासाठी एकच गर्दी

Chittoor Liquor Bottles Loots: आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे दारूचा ट्रक उलटला. ही वार्ता कानोकानी पसरली आणि दारूच्या बाटल्या पळवण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. अनेकांनी लुंगी तर काहींनी खिशात बाटल्या लपवल्या.

कुणी लुंगीत लपवली, कुणी खिशात दडवली, दारूचा ट्रक उलटताच... तळीरामांची दिवाळी... बाटल्या पळवण्यासाठी एकच गर्दी
तळीरामांची दिवाळी
| Updated on: Jun 07, 2026 | 4:56 PM
Share

Chittoor Liquor Bottles Loots: कोणी खिशात दडवली, तर कुणी लुंगीत लपवली. काहींनी तर कार्टनचे कार्टनच पळवले. काहींनी मित्रांसोबत बॉक्स पळवले. दारूचा ट्रक उलटताच एकच गर्दी उसळली. ट्रक चालकाला कोणीही मदत केली नाही. लोकांनी जमेल तसा माल लांबवला. बाटल्या पळवण्यात महिलांही आघाडीवर दिसल्या. काहींनी दारूच्या बाटल्या पळवण्यासाठी पिशव्या आणल्या होत्या. ही घटना आंध्र प्रदेशातील चित्तूर इथे घडली. या घटनेचा व्हिडिओ काहींनी कॅमेऱ्यात कैद केला. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

ट्रक उलटताच, दारु पळवण्यासाठी उसळली गर्दी

दारूची लूट करण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. चित्तूर शहराच्या बाहेरील परिसरात ही घटना घडली. दारुचा ट्रक उलटला. महामार्गावर दारूच्या बाटल्या लुटण्यासाठी गर्दी जमली. अनेक बाटल्या आणि कार्टन रस्त्यावर विखुरले. ते लुटण्यासाठी नागरिक धावले. शुक्रवारी ही घटना घडली. लोकांनी वाहनांवर, थैल्यांमध्ये, मिळेल त्या मार्गाने दारूच्या बाटल्या लांबवल्या. बाटल्या पळवण्यात काही महिलाही दिसून आल्या. काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला.

कुणी लुंगीत लपवली, कोणी थैलीत लपवल्या बॉटल

एका व्हिडिओत दुर्घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी दिसत आहे. लोक हातातील मिळेल तितक्या दारुच्या बॉटल लांबवल्या. काहींनी कार्टन, बॉक्स लांबवले. तर काहींनी लुंगीत, टॉवेलमध्ये आणि बॅगमध्ये भरून बॉटल नेल्या. अनेक महिला सुद्धा या गर्दीत दारुचे कार्टन लांबवताना दिसल्या. पोलिस घटनास्थळी पोहचेपर्यंत लोकांनी एक मोठा भाग लंपास केला होता. वाहन चालकाला कुणीच मदत केली नाही. यामुळे दारु दुकानाच्या आणि पुरवठादाराला मोठे नुकसान झाले.

पोलिस येण्यापूर्वीच अर्धा साठा गायब

पोलिस घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच दारूचा अर्धा साठा गायब झाला. तर पोलिस आल्यानंतर उर्वरीत साठा सुरक्षित ठेवण्यात यश आले. पुरवठादाराला या घटनेने मोठे नुकसान झाले. त्याच्या मते पोलीस येण्यापूर्वीच आर्धा साठा लांबवला गेला. या घटनेत काही लोक पडले. पण कुणाला इजा झाली नाही. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पण इतक्या दारूच्या बॉटल जप्त करण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे. आता हा साठा कधीच हाती येणार नाही असे पुरवठादार म्हणाला. तर लोकांनी मदत करण्याऐवजी दारू लाबंवल्याचा आरोप वाहन चालकाने केला.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली