Maharashtra News LIVE : शिंदेंच्या संपर्कात कोणाचे 14 आमदार? पुन्हा ऑपरेशन टायगर होणार असल्याचा मुरजी पटेलांचा दावा
Maharashtra News LIVE : पुन्हा ऑपरेशन टायगर होणार असल्याचा दावा मुरजी पटेल यांनी केला आहे. शिंदेंच्या संपर्कात कोणाचे 14 आमदार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयातील प्रकरणी मोठी अपडेट समोर आली. यासह राज्य, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES
-
जळगावच्या पाचोरा तालुक्यातील तारखेडा शिवारात बिबट्याने सहा ते सात शेळ्या केल्या फस्त
जळगावच्या पाचोरा तालुक्यातील तारखेडा शिवारात बिबट्याने सहा ते सात शेळ्या फस्त केल्या. एकनाथ पाटील या शेतकऱ्याच्या शेतात बिबट्याने शेळ्यांवर हल्ला करत 6 ते 7 शेळ्या फस्त केल्या. बिबट्याच्या हल्ल्यात सहा ते सात शेळ्यांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे मोठं नुकसान झालं आहे. घटनास्थळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला.
-
गेल्या दहा दिवसांपासून जरांगे पाटलांचे आमरण उपोषण, उपचार, पाणी न घेतल्याने प्रकृती खालावली.
58 लाख कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र वाटप करण्याच्या मागणी संदर्भात आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची मराठवाड्यातील सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. कोल्हापूर सातारा गॅझेटचा जीआर, सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी आणि इतर प्रमुख मागण्यांवर जरांगे पाटील ठाम आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत उपोषण स्थगित करणार नसल्याची भूमिका मांजली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक आणि आरोग्य विभागाचे पथक कालपासून उपचार देण्यासाठी प्रयत्न करत आहे मात्र वैद्यकीय पथकाला परत पाठवले.
-
शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी मोठा दावा केला आहे. राज्यात येत्या काही दिवसांत ‘ऑपरेशन टायगर-4’ पाहायला मिळेल, असा दावा त्यांचीकेलाय. ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य मुरजी पटेल यांनी केलं आहे. लवकरच हे आमदार शिंदे गटात प्रवेश करतील, आमदारांनंतर ठाकरे गटातील नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करतील… असे संकेत देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे, अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून तीन बाळांना मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दोन आठवडे उलटले तरी चौकशी समितीचा अहवाल आलाच नाही. 14 दिवस झाले तरी बाळाच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे. आठच दिवसात समितीचा अहवाल येईल असं सांगण्यात आलं होतं मात्र दोन आठवडे उलटले तरी अहवाल आला नाही. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. डोंबिवलीतून देखील मोठी माहिती समोर आली आहे. डोबिंवलीत भाजपला मनसेचा मोठा झटका बसणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या घराशेजारीच शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यासह राज्य, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Sep 07,2026 8:24 AM
