AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे स्टेशनवर महिलांसाठी पर्सनल हायजिन प्रोडक्ट वेंडिंग मशिन, या स्थानकांपासून सुरूवात

महिला प्रवाशांच्या पर्सनल हायजिन प्रोडक्टची विक्री करणाऱ्या वेंडिंग मशिनची सुविधा रेल्वे स्थानकांवर उपलब्ध झाल्यामुळे महिला प्रवाशांचा फायदा होणार आहे.

रेल्वे स्टेशनवर महिलांसाठी पर्सनल हायजिन प्रोडक्ट वेंडिंग मशिन, या स्थानकांपासून सुरूवात
VENDING MACHINES FOR PERSONAL HYGIENE PRODUCTS Image Credit source: socialmedia
| Updated on: Mar 31, 2023 | 9:11 PM
Share

वडोदरा : महिला रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सैदव तत्पर असलेल्या पश्चिम रेल्वेने आता महिलांच्या पर्सनल हायजिन प्रोडक्टची विक्री करणाऱ्या वेंडिंग मशिनची सुविधा सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या वडोदरा डीव्हीजनद्वारा अशा आधुनिक वेंडिंग मशिनना मोजक्याच स्थानकांवर बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची सोय होणार आहे. पश्चिम रेल्वेने महिला प्रवाशांच्या सोयीसाठी अनोख्या वेंडिंग मशिन बसविण्याचा शुभारंभ केला आहे.

या वस्तूंची होणार विक्री 

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क प्रमुख सुमित ठाकूर यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात माहिती देताना म्हटले आहे की, या वेंडिंग मशिनमध्ये कॅश टाकताच झटपट सॅनेटरी नॅपकीन, फेस मास्क, बेबी डायपर आदी हायजिन वस्तू महिलांना विकत घेता येणार आहेत. या मशिनची स्थापना आणि त्यातून विक्री होणाऱ्या वस्तू सर्व वयोगटातील महिलांच्या गरजा पूर्ण करतील आणि महिलांचा प्रवास सुखकर करतील असे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.

या स्थानकांवर होणार विक्री 

महिलांच्या पर्सनल हायजिन प्रोडक्टची विक्री करणाऱ्या वेंडिंग मशिन सध्या वडोदरा ( बडोदा ) , भरूच, आणंद आणि एकता नगर या स्थानकांवर प्रायोगिक तत्वावर बसविण्यात आल्या आहेत. सध्या या मशिन मोजक्याच स्थानकांवर लावण्यात आल्या असल्या तरी भविष्यात मुंबई तसेच अन्यत्र या मशिन बसविण्याची योजना आहे.

रेल्वेची होणार कमाई

महिला प्रवाशांच्या पर्सनल हायजिन प्रोडक्टची विक्री करणाऱ्या वेंडिंग मशिनची सुविधा रेल्वे स्थानकांवर उपलब्ध झाल्यामुळे रेल्वेचा फायदा होणार आहे. या मशिनसाठी रेल्वे जागा आणि वीज उपलब्ध करणार आहे. तीन वर्षांसाठी कंपनीशी करार करण्यात आला असून दर वर्षाला रेल्वेला यातून 1,60,000/- रूपयांचा महसूल मिळणार आहे.

कॅश टाकताच हायजिन प्रोडक्ट 

या मशिनमध्ये कॅश टाकताच मानवी स्पर्शाशिवाय महिलांना त्यांच्या गरजेच्या वस्तू मिळणे सोपे होणार आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी यासारखे उपक्रम पश्चिम रेल्वे राबवित आली असून यामुळे महिलांना निर्धास्तपणे चिंतामुक्त प्रवास करता येणार असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सूमित ठाकूर यांनी सांगितले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?