महागाईचे चटके वाढणार? भविष्यात पेट्रोल, डिझेलचा भाव…थेट सरकारी अधिकाऱ्यानेच सगळं सांगून टाकलं

पेट्रोल आणि डिझेलचा भाव पुन्हा एकदा वाढला आहे. पाच दिवसांत ही दुसरी भाववाढ आहे. त्यामुळेच भविष्यात आता पुन्हा एकदा इंधनाचा भाव वाढणार का? असे विचारले जात आहे. याबाबत एका सरकारी अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे.

महागाईचे चटके वाढणार? भविष्यात पेट्रोल, डिझेलचा भाव...थेट सरकारी अधिकाऱ्यानेच सगळं सांगून टाकलं
petrol and diesel price today
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 19, 2026 | 3:02 PM

Petrol And Diesel Price : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे सध्या भारतात उर्जासंकट निर्माण झाले आहे. पेट्रोल, डिझेल यांच्या किमती वाढल्या आहेत. दुसरीकडे सीएनजी आणि गॅस सिलिंडरची किंमतही वाढत आहे. इराणचे युद्ध लवकर न थांबवल्या तसेच होर्मुझची सामुद्रधुनी जलव्यापारासाठी पूर्णपणे खुली न झाल्यास हे संकट आणखी गडद होण्याची भीती आहे. त्यामुळेच आता भारतात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. भारतीयांनी काटकसरीने वागावे असे सांगितले जात आहे. दरम्यान, एकीकडे काटकसरीने वागा असे सांगितले जात असताना दुसरीकडे पेट्रोल, डिझेलचा भाव वाढत आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल या इंधनांचा भाव 90 पैशांनी वाढला आहे. त्यामुळेच आता भविष्यात या इंधनवाढीची वाटचाल कशी असेल हे समोर आले आहे.

सध्या पेट्रोल, डिझेलचा भाव काय?

पाच दिवसांत पेट्रोल, डिझेलचा भाव दोन वेळा वाढला आहे. 15 मे रोजी पेट्रोल, डिझेलचा भाव प्रत्येकी 3 रुपये प्रति लीटरने वाढला आहे. आता पुन्हा एकदा आज (19 मे) पेट्रोल आणि डिझेलचा भाव 90 पैसे प्रति लीटरने वाढवण्यात आला आहे. या वाढीसह आता दिल्लीमध्ये पेट्रोल 98.64 रुपये प्रति लीटर तर डिझेल 91.58 रुपये प्रती लीटरवर पोहोचले आहे. मुंबईत हाच भाव 107.59 रुपये प्रति लीटर तर डिझेलचा भाव 94.08 रुपये प्रती लीटरवर पोहोचला आहे.

भविष्यात पेट्रोल-डिझेलचा भाव कसा वाढणार?

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता शासकीय तेल कंपनी IOCL च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे. सामान्य जनतेवर परिणाम पडू नये तसेच महागाईची मोठी झळ बसू नये यासाठीच पेट्रोल आणि डिझेलचा भाव हळू-हळू वाढत आहे, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच सध्यातरी या दोन्ही इंधनाचा भाव नेमका किती वाढेल हे सध्यातरी निश्चितपणे सांगणे कठीण आहे. इंधनाच्या भाववाढीचा कोणताही आकडा सध्याच निश्चित केलेला नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या अधिकाऱ्याने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर भविष्यातही पेट्रोल , डिझेलचा भाव वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Follow Us