AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल पंपांवर ऑनलाइन पेमेंटला नाही, यूपीआयच्या निर्णयाचा थेट फटका, रोख पैसे द्या तरच..

UPI Charge Impact : केंद्र सरकारने यूपीआयच्या नियमात मोठा बदल केला. आता यूपीआय व्यवहारांवर शुल्क लागणार आहे. केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, ज्यानंतर पेट्रोल पंप धारकांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला.

पेट्रोल पंपांवर ऑनलाइन पेमेंटला नाही, यूपीआयच्या निर्णयाचा थेट फटका, रोख पैसे द्या तरच..
Petrol pump
| Updated on: Sep 19, 2026 | 11:13 AM
Share

केंद्र सरकारने यूपीआयच्या नियमात मोठा बदल केला. आता यूपीआयचा व्यवहार फ्रीमध्ये राहणार नाही. यूपीआय व्यवहारासाठी पैसे मोजावी लागणार आहेत. 2 हजाराच्या पुढील व्यवहारावर 0.4 टक्के पैसे लाहणार आहेत. केंद्र सरकारने 2 हजारांपेक्षाच्या जास्त रक्कमेच्या UPI व्यवहारांवर 0.4 मर्चंट डिस्काउंट रेट लागू करण्याची घोषणा केली आहे. याला अनेकांनी विरोध केला. मात्र, सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, अतिरिक्त शुल्क ग्राहकाला नाही तर दुकान मालकाला भरावे लागणार आहे. मात्र, दुकान मालक तरी स्वत: चे नुकसान करून का घेणार? तो देखील ग्राहकांना रोख व्यवहारासाठीच आग्रह करणार. यूपीआय संदर्भात बदललेल्या निर्णयामुळे आता रोख रक्कमेच्या व्यवहारात वाढ होईल.

त्यातच आता UPI शुल्क लागू होण्यापूर्वीच त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. दुकानदारांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांमध्येच नफ्याचे प्रमाण मार्जिन घटण्याबाबत चिंता वाढत असताना पेट्रोल पंपांवर मात्र एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. पेट्रोल पंपांवर परिस्थिती बदलली असून त्याचा फटका ग्राहकांना बसताना दिसतोय.

काही पेट्रोल पंपांवर कॅश पेमेंट फक्त स्वीकारले जाईल, असे फलक लावण्यात आले. पेट्रोल डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना स्पष्ट सांगण्यात आले की, 2000 पेक्षा अधिकचे पेट्रोल आणि डिझेल भरू नये. ऑनलाईन पेमेंट न करण्याबाबत लिहिण्यात आले. कॅश व्यवहारावर भर पेट्रोल पंपांवर दिला जात आहे. केंद्र सरकारने यूपीआय 2 हजारांच्या वरच्या व्यवहारावर शुल्क आकारणार आहे. एमडीआर टॅक्स आकारला जाणार आहे.

पेट्रोल पंप चालकांनी सांगितले की, ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या UPI MDR मर्चंट डिस्काउंट रेट शुल्काबाबत त्यांना अद्याप स्पष्ट सूचना मिळालेल्या नाहीत. तरीही, काहींनी आधीच रोख रक्कम स्वीकारण्यास सुरुवात केली आहे आणि लोकांना या पर्यायाबद्दल माहिती दिली जात आहे. सरकारच्या या नियमामुळे आता रोख रक्कमेच्या व्यवहारात थेटपणे वाढ होणार असल्याचे स्पष्टच आहे. यासोबतच दुकानदार देखील 2 हजारांच्या वरच्या व्यवहार रोख रक्कमेनेच करण्याची शक्यता आहे. यूपीआयचा वापर कमी होण्याची शक्यता आहे.

Follow Us
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर