AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र एटीएसने पीएफआयचे सगळे डाव उधळले…; अग्रवालांचा खळबळजनक दावा..

पीएफआय ही संघटना 2047 पर्यंत देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची योजना आखत होती. समाजात द्वेष पसरवणे हाच त्यांचा एकमेव हेतू होता.

महाराष्ट्र एटीएसने पीएफआयचे सगळे डाव उधळले...; अग्रवालांचा खळबळजनक दावा..
| Updated on: Sep 29, 2022 | 8:43 PM
Share

मुंबईः पीएफआय या संघटनेवर देशातील अनेक ठिकाणी कारवाई केल्यानंतर आता पुन्हा एकदा तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरु करण्यात आली आहे. ही चौकशी सुरु असतानाच महाराष्ट्र एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल (Maharashtra ATS chief Vineet Agarwal)  यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र (Islamic nation) बनवणे हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनांचे (PFI) उद्दिष्ट होते. यासाठी देशभरात पीएफआयच्या शाखांचे जाळे विणले जात होते असंही सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी लोकांना व्याख्यानं देऊन संघटनेचा विचार त्यांच्या मनात बिंबवला जात होता.

त्याचबरोबर आपापल्या घराच्या छतावर स्व-संरक्षणासाठी विटा, दगड आणि धारदार शस्त्रे ठेवण्याचा सल्लाही दिला जात असल्याचे एटीएस प्रमुखांनी सांगितले.

महाराष्ट्र एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांचा दावा केला आहे की, पीएफआय स्वतःला एक सामाजिक संस्था म्हणून सांगत असले तरी त्यामध्ये सत्यता नसल्याचेही सांगितले गेले आहे.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्र एटीएस प्रमुखांनी सांगितले की, ‘पीएफआय ही संघटना सामाजिक विकास, हक्क आणि न्याय आणि शारीरिक व्यायामा यासारख्या कामांसाठी मदत करणारी संस्था म्हणून सांगत असते.मात्र त्यामध्ये सत्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे.

विनीत अग्रवाल यांनी पीएफआय या संघटनेविषयी माहिती देताना सांगितले की, आम्ही डेटा आणि पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत.

2047 पर्यंत देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची पीएफआयकडून योजना आखण्यात आली होती. समाजात द्वेष पसरवण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यातही या संघटनेचा हात होता असंही त्यांनी सांगितले.

त्यांच्या हेतूने टार्गेट ओळखून अडथळे निर्माण करून खुनाचा कट रचला जात होता. आम्ही लवकरच त्याचे खाते गोठवणार आहोत.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.