
कर्नाटकच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या सेक्स स्कँडल प्रकरणात न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिला. जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला लैंगिक अत्याचार, बलात्कार, धमक्या आणि डिजिटल गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय न्यायालयाने त्याला ११ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे, जो पीडितेला भरपाई म्हणून दिला जाईल.
याप्रकरणी एक साडी फार महत्त्वाचा पुरावा ठरली. पीडित महिलेने न्यायालयाला सांगितलं, जेव्हा प्रज्वल रेवन्ना याने बलात्कार केला तेव्हा तीच साडी नेसली होती. पीडित महिले साडी संभाळून ठेवली होती. ज्यावर फॉरेन्सिक तपासणीत शुक्राणूंचे अंश आढळले. याशिवाय, पीडितेने घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला होता, ज्यामध्ये प्रज्वलचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता. हा पुरावा या प्रकरणात निर्णायक ठरला.
पीडित महिने दिलेल्या माहितीनुसार, 2020 आणि 2021 दरम्यान प्रज्वल रेवण्णा सतत व्हिडीओ कॉलवर अश्लील कृत्य करण्यास दबाव टाकत होता. नकार दिल्यानंतर, त्याने पीडितेच्या आईला धमकी देण्यास सुरुवात केली. मी सांगतो तसं केलं नाही तर, वडिलांची नोकरी जाईल आणि बलात्कार करेल… अशी धमकी प्रज्वल देत होता.
प्रकरण उघडकीस आल्यानंतर, पीडितेने उघड केलं की प्रज्वल आणि त्याचे वडील एचडी रेवण्णा यांनी केवळ तिच्या आईवरच बलात्कार केला नाही, तर त्यांच्या घरात काम करणाऱ्या अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे. पीडितेच्या आईने सांगितलं की, एचडी रेवण्णा अनेकदा महिलांना स्टोअर रूममध्ये बोलावून त्यांच्यासोबत अश्लील कृत्ये करायचा.
यादरम्यान पीडितेच्या कुटुंबिया मोठ्या संकटांना सामोरे जावं लागलं… संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. वडिलांची नोकरी गेली… आणि कुटुंबियांना मानसिक छळ सहन करावा लागला…. अखेर न्यायालयात पीडिता म्हणाली, ‘भीती असल्यामुळे आपण सत्य सांगू शकत नाही. पण जेव्हा आईवर होणाऱ्या बलात्काराचा व्हिडीओ पाहिला तेव्हा पोलिसांना सर्वकाही सांगितलं… आज न्यायालयाच्या निर्णयाने आम्हाला विश्वास दिलाय क न्याय जिवंत आहे… जर आम्हाला काहीही झालं तर, जबाबदार प्रज्वल रेवण्ण आणि त्याचं कुटुंब असेल…’