पीएम मोदी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बोलावली उच्च स्तरिय बैठक, मध्य-पूर्वेतील स्थितीवर होणार चर्चा

मध्य पूर्वेतील परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधणार आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीला निवडणूक असलेल्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांचा समावेश असणार नाही. त्या राज्यातील सचिवांशी स्वतंत्र बैठक होणार आहे.

पीएम मोदी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बोलावली उच्च स्तरिय बैठक, मध्य-पूर्वेतील स्थितीवर होणार चर्चा
PM MODI
| Updated on: Mar 26, 2026 | 6:57 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या शुक्रवारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी उच्च स्तरिय बैठक घेणार आहेत. उद्या सायंकाळी ६.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत ज्या राज्यात निवडणूका आहेत त्या राज्याचे मुख्यमंत्री सामील होणार नाहीत. या बैठकीत मध्य पूर्वेतील स्थितीवर चर्चा होणार आहे. आचारसंहितेमुळे निवडणूक असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद करण्यासाठी सामील नसतील.

या बैठकीत ऊर्जा संकटाशी सामना करण्यासाठी राज्याची तयारी आणि योजनांची तयारी याचा आढावा पंतप्रधान घेतील असे म्हटले जात आहे. संकटाच्या या घडीला टीम इंडियाच्या भावनेसोबत ताळमेळ दाखवण्याचा हा प्रयत्न असणार आहे. निवडणूक असणाऱ्या राज्यातील सचिवांशी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल जी कॅबिनेट सचिवालयाच्या माध्यमातून आयोजित केली जाणार आहे.

मध्य पूर्वेतील संकटामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत सक्रीय असून पश्चिम आशियातील नेत्यांशी बोलत आहेत. या मुद्यावर त्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले होते. पश्चिम आशियातील परिस्थिती या वेळी खूप चिंताजनक आहे.आणि या संकटाला तीन आठवड्यांचा काळ लोटलेला आहे. या संकटाशी केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग सामना करत असल्याचे मोदी यांनी यावेळी म्हटले होते.

संपूर्ण जग यावेळी संकटात

या संकटाचा जगाच्या अर्थव्यवस्था आणि लोकांच्या जीवनावर परिणाम होत आहे. पीएम मोदी यांनी सांगितले की भारतासाठी हे युद्ध आर्थिक, राष्ट्रीय सुरक्षा आणि मानवीय तिन्ही पातळ्यांवर अनेक आव्हाने घेऊन समोर आले आहे. कच्चे तेल आणि गॅसच्या गरजांसोबत, आखाती देशात एक कोटी भारतीय राहातात आणि काम करत आहेत. त्यांच्या सुरक्षेला भारत सरकारची सर्वोच्च प्राधान्य आहे.

होर्मुझ सारख्या महत्वाच्या मार्गातून जहाजांची येजा करणे आव्हानात्मक झाले आहे. यामुळे भारताची जागतिक व्यापार आणि पुरवठा चेन प्रभावित झाली आहे असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. भारताचा कच्चा तेल आणि नैसर्गिक गॅस पुरवठा बाधित होऊ शकतो आणि खतांच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले. त्यांनी भारताच्या जवळ ५३ लाख मेट्रीक टनाचा धोरणात्मक पेट्रोलियमसाठी सुरक्षित आहे असे आश्वस्तही केले.

शांतता आणि संवाद हा एकमेव मार्ग

भारताच्या संसदेतून शांततेची एकजूट आणि एकमताचा आवाज संपूर्ण जगात जायला हवा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत सांगितले. शांतता आणि संवाद हाच एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. संकटावर उत्तर शोधण्यासाठी पीएम मोदी इस्राईल, इराण, अमेरिका आणि अन्य आखाती देशांच्या नेत्याशी सतत संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक

मध्य पूर्वेतील संकटावर चर्चा करण्यासाठी सरकारने गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीचे अध्यक्ष स्थान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भूषवले होते. या वेळी सरकारने विरोधी पक्षांना सांगितले की पेट्रोलियम प्रोडक्ट्सची कोणतीही कमतरता नाही. स्ट्रेट ऑफ होर्मुझ येथून चार भारतीय जहाजे सुखरुप निघाली आहेत.जनतेने पॅनिक होण्याची कोणतीही गरज नाही. विरोधी पक्षांनी कोणतीही माहिती हवी असेल तर त्यांनी संपर्क करावा असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.

Follow Us