AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवरील हल्ल्यास इस्राईल नव्हे हा मुस्लीम देश उकसवतोय ?

Iran Isreal US War:मध्य पूर्वेतील युद्धाने सौदी अरबला मोठे आर्थिक आणि सुरक्षे संदर्भातील नुकसान झेलावे लागत आहे. सौदी सरकारने म्हटले आहे आमची सर्वात मोठी चिंता आपल्या जनतेला हल्ल्यांपासून वाचवणे ही आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवरील हल्ल्यास इस्राईल नव्हे हा मुस्लीम देश उकसवतोय ?
iran war
| Updated on: Mar 24, 2026 | 9:40 PM
Share

मध्य पूर्वेतील युद्धामुळे संपूर्ण जगाच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे. तेल आणि गॅसची टंचाई जाणवत असल्याने हे युद्ध थांबावे यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. मात्र, या दरम्यान एका बातमीनुसार सौदी अरबचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हे इराणविरुद्ध सैनिक कारवाई करण्यास फशी पाडत असल्याचे म्हटले जात आहे. सौदी अरब हा मुस्लीम देश असून त्याने इराणला नष्ट करुन येथील भौगोलिक रचना बदलण्याची ही सुवर्ण संधी असल्याचे अमेरिकेला म्हटल्याचे सांगितले जात आहे.

इराणची सत्ता उलटवावी – सौदी

न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीनुसार सौदी अरबचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अलिकडेच डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवर सातत्याने दबाव तयार करण्यास सांगितले आहे. त्यांनी इराण हा आखाती देशांसाठी धोका आहे. त्यामुळे इराणची सध्याचे सरकार बदलूनच हा धोका कमी करता येऊ शकतो.मात्र, इस्राईलचे पंतप्रधान नेतान्याहू देखील इराणला धोका मानत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सौदी अरबची चिंता वेगळी आहे. या बातम्या आल्यानंतर सार्वजनिक रुपात सौदीने मात्र युद्ध लांबवण्यास दबाव टाकण्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.

सौदीला शांततापूर्ण तोडगा हवा

एका अधिकृत वक्तव्यात सौदी सरकारने म्हटले आहे की आम्ही हे युद्ध सुरु होण्याच्या आधीही नेहमची शांततापूर्ण उत्तराचे समर्थन केले होते. आज आमची सर्वात मोटी चिंता आपल्या लोकांना आणि त्यांच्या घरांना रोज होणाऱ्या हल्ल्यांपासून रक्षण करण्याची आहे. इराणने राजकीय चर्चेच्या ऐवजी खतरनाक संघर्षाचा मार्ग निवडला आहे. यामुळे सर्व संबंधित पक्षाचे नुकसान होऊ शकते. मात्र, सर्वाधिक नुकसान इराणचेच झाले आहे.

सौदीचा जमीनी सैन्य कारवाईचा सल्ला – बातमी

या युद्धामुळे सौदीला आधीच आर्थिक आणि सुरक्षेसंदर्भात नुकसान झेलावे लागत आहे. अमेरिका-इस्राईलच्या हल्ल्याचा विरोधात इराणने आखाती देशांना लक्ष्य करण्यास सुरु केले आहे.मिसाईल आणि ड्रोनने हल्ले होत आहेत. त्यामुळे इंधनाचा व्यापार ठप्प झाला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ प्रभावित झाल्याने सौदी अरब, युएई आणि कुवैत सह आखाती देशांच्या निर्यातीवर परिणाम होत आहेत. ट्रम्प कधी तणाव कमी करण्याचा संकेत देतात तर कधी तणाव वाढवण्याचे संकेत देत आहेत.

न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीनुसार सौदीचा प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी इराणच्या एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरला टार्गेट करण्यास आणखीही कठोर कारवाईच्या बाजूने सहमती दर्शविली आहे. बातमीत म्हटले आहे की मोहम्मद बिन सलमान यांनी तेहराण येथील सरकारला कमजोर करण्यासाठी जमीनी सैनिकी कारवाईचा सल्ला दिला आहे.

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन