पीएम मोदी हे चीनच्या राष्ट्राध्यक्षांपेक्षा अधिक दूरदर्शी, आंतरराष्ट्रीय मीडियातून मोदींचं कौतूक
G20 summit : दिल्लीत झालेल्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक देशाच्या लोकांना निमंत्रण देऊन एकत्र आणलं. पंतप्रधान मोदींच्या या पुढाकारामुळे रशिया नंतर इतर देशातील मीडियाने देखील कौतूक केले आहे. त्यांना ग्लोबल लीडर म्हटले आहे.

मुंबई : G20 शिखर परिषदेच्या यशानंतर भारताची जगभरात चर्चा आहे. आज मोठे मोठे देश भारताच्या नेतृत्वात काम करण्याची तयारी दाखवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इतर देशातील नेत्यांसोबत असलेलं बॉन्डिंग जगाने पाहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या आठवड्यात झालेल्या शिखर परिषदेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. G20 च्या माध्यमातून अनेक देशांना एकत्र आणण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. लंडनच्या वर्तमानपत्रांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतूक केले आहे.
भारत आणि अमेरिकेचे संबंध असो, भारत आणि ब्रिटनचे संबंध असो किंवा भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध असो. पंतप्रधान मोदी यांनी या नेत्यांसोबत आता मजबूत संबंध बांधले आहेत. हवामान बदल, जागतिक बँकेची नूतनीकरणाची गरज, संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण, आर्थिक स्थैर्य, युक्रेनमधील युद्ध, यासारख्या जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी मजबूत ठोस प्रयत्नांची पहिली पायरी म्हणून दिल्लीतील घोषणेचे जागतिक माध्यमांनी वर्णन केले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अनुपस्थितीत या अजेंड्यावर सहमती झाली असली तरी, त्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या संबंधित सरकारांशी स्पष्ट केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर स्वाक्षरी करणार नाही असे लिहिले.
शी जिनपिंग यांनी भारतात येणे टाळले. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष ही आले नाहीत. पण यांच्याशिवाय भारताने जी२० परिषद यशस्वी करुन दाखवली. त्यांची उणीव कुठेही जाणवली नाही.
नवीन BRICS साठी भारत-चीन एकजुटीचा अभाव हा एक मोठा अडसर असल्याचे दिसते. जी-20 शिखर परिषदेला शी जिनपिंग यांच्या अनुपस्थितीमुळे दोन्ही देशांमधील दरी आणखी वाढली आहे. G20 शिखर परिषदेच्या यशामुळे मोदी या हंगामाच्या शिखर परिषदेचे स्पष्ट विजेते ठरले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याकडे शी जिनपिंग यांच्यापेक्षा अधिक दूरदर्शी राजकारणी म्हणून पाहिले जाते, असे लंडनच्या वर्तमानपत्रांनी म्हटले आहे.
G20 ने आफ्रिकन युनियनचा समावेश करून त्यांची संख्या वाढवली. जे आता G21 होणार आहे. हा विजय मोदींचा स्पष्ट मुत्सद्दी विजय होता. त्याची ग्लोबल साऊथ चॅम्पियन म्हणून प्रतिमा अधिक झळकली.
