AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी खळबळ

Narendra Modi Death Threat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत तपास यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

मोठी बातमी! पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी खळबळ
PM modi gets death threatImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 04, 2026 | 9:16 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत, अशातच आता त्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी त्यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तानुसार, मेलबर्न येथे होणाऱ्या “मेलबर्न मीट्स मोदी” कार्यक्रमाशी संबंधित एका फेसबुक पोस्टवरील कमेंटद्वारे ही धमकी देण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत ऑस्ट्रेलियातील सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ते 10 जुलैदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न दौऱ्यावर जाणार असून, या काळात ते भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. मात्र या दौऱ्यापूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, मेलबर्नच्या मार्व्हल स्टेडियममध्ये 9 जुलै रोजी होणाऱ्या मेलबर्न मीट्स मोदी कार्यक्रमाच्या प्रचारासाठी करण्यात आलेल्या फेसबुक पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये ही कथित धमकी देण्यात आली आहे. अबू मुस्तफा नावाच्या फेसबुक अकाउंटवरून, “स्टेडियमचे छत बंद ठेवावे, अन्यथा मोदी ऑस्ट्रेलियात त्यांच्या मृत्यूसाठी येत आहेत,” अशी धमकीची कमेंट करण्यात आली होती. ही पोस्ट समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या असून तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

ऑस्ट्रेलियन यंत्रणांकडून तपास

ऑस्ट्रेलियन तपास अधिकाऱ्यांनी फेसबुक अकाउंटशी जोडलेल्या IP अ‍ॅड्रेसची ओळख पटवली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही, तसेच तपासाबाबत अधिक माहिती देण्यासही त्यांनी नकार दिला आहे. मात्र, सुरक्षा यंत्रणा या कथित धमकीची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहेत अशी माहिती समोर आली आहे.

मोदी 8 ते 10 जुलैदरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ते 10 जुलैदरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात ते मेलबर्न येथे आयोजित भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक लीडर्स समिटमध्ये सहभागी होतील. तसेच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर मोदी मेलबर्न मीट्स मोदी या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ