Covid Vaccination: 50 टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झालेल्या राज्यांची पंतप्रधान मोदी घेणार बैठक, महाराष्ट्राचा समावेश

| Updated on: Oct 31, 2021 | 5:34 PM

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 3 नोव्हेंबरला मोदी कमी लसीकरण कव्हरेज असलेल्या जिल्ह्यांसाठी त्या राज्यांची आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत कोविड-19 च्या लसीचे पहिल्या डोसचे 50 टक्क्यांपेक्षा कमी कव्हरेज असलेले आणि लसीच्या दुसऱ्या डोसचे कमी कव्हरेज असलेल्या जिल्ह्यांचा समावेश असेल. यात महाराष्ट्राचा जिल्ह्यांचा देखील समावेश आहे.

Covid Vaccination: 50 टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झालेल्या राज्यांची पंतप्रधान मोदी घेणार बैठक, महाराष्ट्राचा समावेश
Follow us on

भारताने नुक्ताच कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा 100 कोटीचा टप्पा पार कोला. मात्र सगळ्याच राज्य त्यांचा लसीकरणाचा अपेक्षीत टप्पा गाठण्यात अयश्वी ठरले आहेत. याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांशी आढावा बैठक घेणार आहेत. (PM Modi to hold meeting with states with less covid vaccination)

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 3 नोव्हेंबरला मोदी कमी लसीकरण कव्हरेज असलेल्या जिल्ह्यांसाठी त्या राज्यांची आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत कोविड-19 च्या लसीचे पहिल्या डोसचे 50 टक्क्यांपेक्षा कमी कव्हरेज असलेले आणि लसीच्या दुसऱ्या डोसचे कमी कव्हरेज असलेल्या जिल्ह्यांचा समावेश असेल. यात महाराष्ट्राचा जिल्ह्यांचा देखील समावेश आहे.

कोणते राज्य उप उपस्थित असतील

या बौठकीत एकूण 40 हून अधिक जिल्हाअधिकारी उपस्थित असतील. हे जिल्हे ज्या राज्यांमध्ये आहेत, त्या राज्यांचे मुख्यमंत्रीही यावेळी उपस्थित राहणार आहेत. ज्या राज्यांमध्ये लसीकरण कमी आहे त्यात महाराष्ट्र, मेघालय, झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, आणि इतर राज्यांचा समावेश आहे.

या बौठकीत महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या G20 शिखर परिषद आणि COP26 परिषदेसाठी ब्रिटनमध्या आहेत. ही परिषद 2 नोव्हेंबरला संपणार आहे. भारतात परतल्यानंतर लगेचच, मोदी 3 नोव्हेंबर रोजी ही लसीकरण आढावा बैठक घेतील.

लसीकरणाचे आकडे

दरम्यान, निर्बंध उठवले जात असले तरी, लसीकरण मोहीम भारतात जोरात सुरू आहे. या वर्षी जानेवारीपासून ही मोहीम सुरू झाली. देशात 106.14 कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. एकत्रितपणे, देशातील संपूर्ण प्रौढ पात्र लोकसंख्येपैकी, 73.16 कोटींहून अधिक लोकांना लसीचा किमान पहिला डोस मिळाला आहे. प्रत्यक्षात, देशात दोन्ही डोस मिळुन जवळपास 33 कोटी लोकांना पूर्णपणे लसीकरण झालेले आहे. त्यापैकी 68,04,806 लसींचे डोस गेल्या 24 तासांत देण्यात आले.

Related News

कोरोनाविरोधातील युद्ध अजून संपलेलं नाही, सण-उत्सवाच्या काळात सतर्क राहा; मोदींचं देशवासियांना आवाहन

Covid Updates: भारतात तिसऱ्या लाटेचा धोका टळलाय का?

कोरोनाने भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य दोन वर्षांनी घटवले, या दाहक निष्कर्षाचे काय, सामनातून सवाल

Covid Updates:लसीकरण झालेल्या परदेशी प्रवाशांना आजपासून विलगीकरण नाही; मात्र, आरटीपीसीआर रिपोर्ट हवाच

PM Modi to hold meeting with states with less covid vaccination