वूई विल डू इट… वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा नारा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सार्वजनिक जीवनातील 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल देशवासियांना संबोधित केले. 'वूई विल डू इट... आपण करूनच दाखवू' हा नवा नारा देत त्यांनी विकसित भारताचा संकल्प केला. आपल्या राजकीय प्रवासातील प्रत्येक अनुभवातून शिकलो असून, जनता आणि संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

वूई विल डू इट... वूई विल डू इट... आपण करूनच दाखवू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा नारा
narendra modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2026 | 10:56 AM

ज्यांनी मला जिंकवलं त्यांनी मला विनम्र व्हायला शिकवलं. ज्यांनी मला पाडलं त्यांनी मला उभं राहायला शिकवलं. शुभचिंतकांनी प्रोत्साहीत केलं आणि टीकाकारांनी मला आपल्यामध्ये पाहण्यास शिकवलं. ज्यांनी साथ दिली त्यांनी मला विश्वासाची शक्ती दाखवली. ज्यांनी विरोध केला त्यांनी मला लोकशाहीची शक्ती समजावली. प्रत्येक संकट माझ्या धैर्याची परिक्षा घेत होती. प्रत्येक सिद्धीने मला मोठ्या लक्षापर्यंत जाण्याचं सामर्थ्य दिलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. जे काम हाती घेतलं ते आपण करणारच आहोत, आपण करूनच दाखवू असं सांगतानाच मोदींनी वूई विल डू इट… वूई विल डू इटचा नाराही दिला. आपण विकसित भारत करणार आहोत, वई विल डू इट… अशा घोषणाही त्यांनी दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकारांचे प्रमुख आणि शासन आणि लोकसेवेला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला. माझ्या आयुष्यातील कोणतीही घटना वाया गेली नाही. प्रत्येक घटनेने मला काही ना काही शिकवलं. भूजच्या भूकंपाने मला पुनर्निमाणासाठी उभं राहायला शिकवलं. चंद्रयानने मला अपयशातून उंच उडायला शिकवलं. कोरोनाने मला राष्ट्राच्या सामूहिक चेतनेचं महत्त्व शिकवलं. मीडियाने मला चांगले वाईट अनुभवातून पुढे जायला शिकवलं. प्रत्येक गोष्टीतून मला शिकतं आलं. गरीबांनी मला साधन संसाधन मर्यादित असले तरी स्वप्न मोठी असली पाहिजे हे शिकवलं. निर्धार मोठा असला पाहिजे हे शिकवलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Loading...

संविधानाला नमन करतो

7 ऑक्टोबर 2021 रोजी मी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा वाटलं नव्हतं हा दिवस उगवेल. आज मला सरकारचा प्रमुख म्हणून निरंतर सेवा करताना 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. हा जनतेच्या आशीर्वादाचा परिणाम आहे. भाजप, एनडीए आणि लोकशाहीबद्दल श्रद्धा असणाऱ्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे मी आभार मानतो. मी देशाच्या जनतेच्या चरणेवर माथा टेकवून नमन करतो. मला जनतेने विधानसभा आणि लोकसभेत यश दिलं. मी संविधानालाही नमन करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी सांगितलं.

परमेश्वराने आणखी शक्ती द्यावी

मी मंदिरात गेलो होतो. देवाकडे मी 140 कोटी भारतीयांसाठी प्रार्थना केली. मी स्वत:साठीही प्रार्थना केली. परमेश्वरांनी मला इतकी शक्ती आणि सामर्थ्य द्यावं की मी आपल्या देशासाठी अधिक ऊर्जेने काम करू शकेल. देशवासियांची अधिक सेवा करू शकू. दिवसरात्र सेवा करू शकू, ही प्रार्थना केली. मी जे काही आहे, ज्या पदावर आहे, त्यात सर्वाधिक योगदान जनतेचं आहे, असंही मोदी म्हणाले.

हीच मोठी संपत्ती

माझ्यासाठी जनता सुद्धा ईश्वराचं रुप आहे. लाखो कोट्यवधी देशवासियांचा विश्वास आणि परिश्रम ही माझी मोठी शक्ती राहिली आहे. देशाने मला खूप काही दिलं. त्यामुळे मी देशासाठी माझं दायित्व सर्वाधिक आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचा माझ्यावर सर्वाधिक अधिकार आहे हे मी मनापासून मानतो. या 25 वर्षाचा अनुभव ही मोठी संपत्ती आहे. ही संपत्ती केवळ मोदींची नाही, ही मोदी देशाची आहे. प्रत्येक नागरिकांचा या संपत्तीवर अधिकार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us