AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहीण-भावाला मोठा झटका… राहुल गांधी आणि प्रियंका यांच्या विरोधात एफआयआर; आरोप काय?

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या विरोधात दिल्लीत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित घोटाळ्याच्या विरोधात इंडिया आघाडीने आंदोलन केले होते. यावेळी आकाशवाणी भवनात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

बहीण-भावाला मोठा झटका... राहुल गांधी आणि प्रियंका यांच्या विरोधात एफआयआर; आरोप काय?
rahul gandhiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2026 | 10:05 AM
Share

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिल्लीत आंदोलन करणं चांगलंच भोवलं आहे. या दोन्ही बहीणभावाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दिल्लीत इंडिया आघाडीने आंदोलन केलं होतं. यावेळी आकाशवाणी भवनात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला म्हणून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे दोघांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कालच्या आंदोलनावेळी आकाशवाणी भवनमध्ये जबरदस्तीने घुसले होते. त्यांना अटकाव केल्यानंतरही त्यांनी आकाशवाणी भवनात प्रेश केला होता. त्याममुळे दिल्ली पोलिसांनी त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. राहुल आणि प्रियंका यांच्यासहीत इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांना काल रात्रीच दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

अन् ठिय्या आंदोलन सुरू

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी काल इंडिया आघाडीने दिल्लीत मोर्चाचं आयोजन केलं होतं. संसदभवन ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत हा मार्च काढण्यात आला होता. या मार्चमध्ये इंडिया आघाडीचे 140 खासदार सहभागी झाले होते. हा मार्च निघाल्यानंतर आकाशवाणीपासून 400 मीटर अंतरावर हा मोर्चा अडवण्यात आला होता. त्यामुळे राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. संध्याकाळपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू होतं. त्यामुळे दिल्लीतील वातावरण अधिकच तापलं होतं. आंदोलकांना पोलिसांनी आधी ताब्यात घेतलं होतं. नंतर त्यांना सोडून देण्यात आलं. त्यानंतर पुन्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं.

आकाशवाणी भवनाकडे कूच

त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आकाशवाणी भवनाकडे कूच केली होती. त्यांनी आकाशवाणी भवनात घुसण्याचा प्रयत्न केला. पण तरीही त्यांना अडवण्यात आलं होतं. पण दोन्ही नेत्यांनी कुणालाही न जुमानता थेट आकाशवाणी भवनात प्रवेश केला होता. इंडिया आघाडीच्या कालच्या आंदोलनावेळी संसद ते निवडणूक आयोगापर्यंत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. आंदोलकांनी आयोगाच्या कार्यालयात घुसू नये म्हणून संपूर्ण खबरदारी घेण्यात आली होती.

Follow Us
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा