
Pradhan Mantri Mudra Yojana : पंतप्रधान मुद्रा योजनेने अनेक चमत्कार घडवले. देशात लघु, मध्यम उद्योजकांची लाटच आली. या योजनेला आता 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. 8 एप्रिल 2015 रोजी ही योजना सुरू झाली होती. 2014 मध्ये नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांनी या योजनेची एकाच वर्षानंतर पायाभरणी केली. मोदी यांच्या महत्त्वकांक्षी योजनांपैकी ही एक मानण्यात येते. अनेकांना उद्योग व्यवसाय करण्याची इच्छा असते. पण भांडवल हा मोठा प्रश्न असतो. त्यावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मुद्रा योजना आणली. विनातारण कर्ज देण्याची ही योजना अनेकांसाठी संजीवनी ठरली. त्यांच्या स्वप्ननांना नवीन आर्थिक बळ मिळाले. या योजनेने स्थानिकस्तरावर नवउद्योजकांची एक लाटच आणली. कुटीर उद्योजक, लघू, मध्यम उद्योजकच नाही तर कोट्यवधींची उलाढाल करणारे नवीन उद्योजकीय परीघ या योजनेने तयार केले. मुद्रा योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी लोकांनी सरकारकडून कर्ज घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू केला, त्यामुळे त्यांचे नशीब आणि जीवन दोन्ही बदलले. ...