कामगारांचे पगार कापू नका, व्यापारी आणि श्रीमंतांना पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

तुम्ही ज्या व्यक्तींकडून सेवा घेता त्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन त्यांचा पगार कापू नका," असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Corona Virus) म्हणाले.

कामगारांचे पगार कापू नका, व्यापारी आणि श्रीमंतांना पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
Follow us
| Updated on: Mar 19, 2020 | 9:16 PM

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Corona Virus) हे देशातील जनतेला 8 वाजता संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 मार्चला ‘जनता कर्फ्यू’ पाळा असे आवाहन केले. यावेळी “सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत कोणीही घराबाहेर पडू नका, अत्यंत आवश्यक असेल, पर्याय नसेल तरच त्या दिवशी घराबाहेर पडा,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

“या संकटाच्या वेळी माझे देशातील व्यापाऱ्यांना, उच्च वर्गातील आवाहन (PM Narendra Modi Corona Virus) आहे की, तुम्ही ज्या व्यक्तींकडून सेवा घेता त्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन त्यांचा पगार कापू नका,” असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“दूध, खाण्या-पिण्याचे सामान, औषध किंवा जीवनावश्यक गोष्टी तूट भासू नये यासाठी अनेक आवश्यक पावलं उचलली जात आहेत. त्यामुळे त्यांचा साठा करु नका,” असेही मोदी म्हणाले.

“कोरोनापासून उत्पन्न होणाऱ्या आर्थिक तूट लक्षात घेता अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वात सरकारने ‘कोविड 19 Economic Response Task Force तयार करण्यात येणार आहे,” असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

“हे टास्क फोर्स देशातील आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी जी आवश्यक पावलं उचलेल. ज्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल,” असेही मोदी म्हणाले.

“जर शक्य असेल तर प्रत्येक दिवशी कमीत कमी 10 लोकांना कोरोना विषाणूंपासून बचावाचे उपाय सांगा. त्यासोबत जनता कर्फ्यूबाबतही सांगा,”

“जनता कर्फ्यू म्हणजे जनतेसाठी, जनतेद्वारे लावण्यात आलेला कर्फ्यू, येत्या रविवारी म्हणजे 22 मार्चला जनता कर्फ्यू करा. 22 मार्चच्या जनता कर्फ्यूबाबत जनजागृती करा, शक्य तितक्या लोकांना माहिती द्या,” असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

“जे आपत्कालीन सेवेत काम करतात त्या सर्वांचे संध्याकाळी 5 वाजता धन्यवाद माना. संध्याकाळी 5 वाजता आपल्या घराच्या दरवाज्यात, खिडकीत, बाल्कनी 5 मिनिटे उभे राहून त्यांचे आभार व्यक्त करा,” असेही मोदी म्हणाले.

“या संकटाच्या वेळी माझे देशातील व्यापाऱ्यांना, उच्च वर्गातील व्यक्तींना आवाहन आहे की, तुम्ही ज्या ज्या व्यक्तींकडून सेवा घेता त्यांचे आर्थिक हित लक्षात घेता त्यांचा पगार कापू नका,” असेही नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Corona Virus) म्हणाले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.