
Ram Dhwaj at Ram Mandir At Ayodhya: प्रभू श्रीरामाचे विविध शब्द सुमनांनी कौतुक आणि विस्तृत वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भक्तीरसात डुबून गेले. आज अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर रामध्वजाचे आरोहण करण्या आले. या धर्मध्वजारोहणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत आणि मोठ्या संख्येने साधूसंत उपस्थित होते. आज रामनगरी सुंदर फुलांनी सजली होती. हा ध्वज खूप दुरून दुष्टीस पडतो.
शतकांच्या वेदनांना विराम मिळाला
यावेळी आपल्या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिर स्थापनेच्या संघर्षावर विचार व्यक्त केले. संपूर्ण भारत, संपूर्ण विश्व राममय आहे. प्रत्येक राम भक्ताच्या हृदयात अद्वितीय संतोष आहे. असीम कृतज्ञता आहे. आपार अलौकीक आनंद आहे. शतकानुशतकाच्या जखमा भरत आहेत. शतकानुशकताच्या वेदनांना विराम मिळत आहे. अनेक वर्षाचा संकल्प सिद्धीप्राप्त होत आहे. ज्या यज्ञाची अग्नी ५०० वर्ष प्रज्वलीत राहिली, जो यज्ञ एक क्षणही आस्थापासून दूर गेला नाही. एक क्षणही विश्वासापासून दूर गेला नाही, तो यज्ञ आज घडत आहे. आज श्रीरामाचा दिव्य प्रताप या ध्वजातून प्रतिष्ठापित झाला आहे. हा केवळ एक ध्वज नाही. हा भारतीय सभ्यतेचा पुनरजागरणचा ध्वज आहे, असे पंतप्रधान यांनी स्पष्ट केले.
धर्मध्वज रामाच्या आदर्शाचा उद्घोष
याचा भगवा रंग, त्यावरील सूर्यवंशाची ख्याती, त्यावर शब्द आणि वृक्ष राम राज्याच्या कीर्तीला प्रतिरुपीत करत आहे. हा ध्वज संकल्प आहे,. हा ध्वज यश आहे. हा ध्वज संघर्षातून सृजनाची गाथा आहे. हा ध्वज अनेक शतकांच्या स्वप्नाचं प्रतिक आहे. हा ध्वज संतांची साधना आणि समाजाची प्रेरणा आहे. अनेक शतके हा धर्मध्वज रामाच्या आदर्शाचा उद्घोष करेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
हा धर्म ध्वज सत्यमेव जयतेचं आवाहन आहे. म्हणजे विजय सत्याचीच होते. असत्याची नाही. सत्य हेच बह्रमाचं स्वरुप आहे. सत्यातच धर्म स्थापित आहे. प्राण जाये पर वचन न जाए हेच हा ध्वज सांगेल. जो सांगितलं जातं तेच करावं हेच हा ध्वज सांगेल. विश्वात कर्म आणि कर्तव्याला प्राधान्य दिलं पाहिजे, हेच हा ध्वज सांगेल. हा धर्मध्वज वैर मिटवायला सांगेल. सर्वांचं सुख पाहायला सांगेल. भेद भाव आणि पीडेतून मुक्ती देण्यास सांगेल. कोणी दुखी राहू नये, कोणी दरिद्री राहू नये, गरीबी राहू नये असा समाज बनवा असं हा ध्वज सांगेल, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.
जे लोक एखाद्या कारणाने मंदिरात येत नाही आणि लांबूनच मंदिराला नमस्कार करतात त्यांनाही तेवढच पुण्य मिळतं. हा धर्म ध्वज मंदिराच्या ध्येयाचं प्रतिक आहे. या ध्वजातून दूरनच रामलल्लाच्या भूमीचं दर्शन घडवेल. युगायुगापासून मानवमात्रापर्यंत हा ध्वज मानवता पोहोचवेल. मी कोट्यवधी रामभक्तांना या अविस्मरणीय क्षणाची हार्दीक शुभेच्छा देतो. मी आज प्रत्येक दानवीरांचे आभार मानतो. राम मंदिराच्या निर्मामआसाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानतो. कामगारांचेही मी अभिनंदन करतो. वास्तूकारांचेही आभार मनातो. आयोध्येत आदर्श हे आचरणात येते. याच नगरीतून रामाने आपल्या जीवनास सुरुवात केली होती. याच अयोध्येने जगाला सांगितलं की, एक व्यक्ती कसा समाजाच्या शक्तीने, त्याच्या संस्काराने पुरुषोत्तम बनतो. जेव्हा राम अयोध्यातून वनवासात गेले तेव्हा ते युवराज राम होते. परत आले तेव्हा ते मर्यादा पुरुषोत्तम होते. महर्षी वसिष्ठांचं ज्ञान, अगस्त्यचं मार्गदर्शन, शबिरीची ममता, हनुमानाचं समर्पण अशा अनेकांचं त्यांच्या जीवनात महत्त्व राहिलं आहे, असे प्रभू श्रीरामांच्या जीवनाची आदर्शगाथा त्यांनी सांगितली.