Narendra Modi: सलग 25 वर्षांपासून सत्तेच्या केंद्रस्थानी, गुजरातपासून ते दिल्लीपर्यंत… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अखंड नेतृत्वाची प्रेरणादायी कहाणी
PM Narendra Modi: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनसेवेची 25 वर्षे पूर्ण होत आहेत. सामाजिक जीवनातून राजकीय प्रवासाचा त्यांचा हा झंझावात अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. गेल्या 17 सप्टेंबरपासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत भाजपतर्फे सेवा संकल्प अभियान राबवल्या जात आहे.

PM Narendra Modi: सामाजिक कार्यासाठी झोकून काम करणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी राजकीय वळणावर त्यांची अमिट छाप सोडली. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सार्वजनिक जीवनाला सुरूवात केली. पंतप्रधान म्हणून या लोकसेवेला आज 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्षे पूर्ण होत आहेत. 7 ऑक्टोबर 2001 रोजी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यांनी देशातील दीर्घकाळ मुख्यमंत्री आणि पंतप्रधान राहण्याचा विक्रमही नोंदवला आहे. सामाजिक जीवनातून राजकीय प्रवासाचा त्यांचा हा झंझावात अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. गेल्या 17 सप्टेंबरपासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत भाजपतर्फे सेवा संकल्प अभियान राबवल्या जात आहे.
सर्वाधिक काळ पद भूषवण्याचा विक्रम
स्वातंत्र्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे 16 वर्षे 286 दिवस या पदावर कार्यरत होते. सिक्कीमचे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग हे 24 वर्षे 165 दिवस सत्ता स्थानी होते. तर नवीन पटनायक यांनी 24 वर्षे 98 दिवस ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या दोन्ही पदांवर सर्वाधिक काळ राहण्याचा बहुमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला. आज 7 ऑक्टोबर रोजी त्यांच्या या लोकसेवेला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. असा बहुमान मिळवणारे ते देशातील एकमेव नेते ठरले आहेत.
वडनगर ते दिल्ली
गुजरात राज्यातील वडनगरसारख्या छोट्या शहरातून एका गरीब कुटुंबातून नरेंद्र मोदी यांचा खडतर प्रवास झाला. त्यांनी एका राज्याचाच नाही तर देशाच्या आणि जागतिक राजकारणावरही प्रभाव सोडला. मोठे जनसमर्थन मिळवणारे आणि विरोध सहन करणारेही ते नेते आहेत. समाज संघटनासाठी त्यांनी घराचा त्याग केला. 1974 साली गुजरातमधील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले. आणीबाणीविरोधात ते उतरले. त्यांनी भूमिगत आंदोलन केले. पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी विविध कार्यात स्वतःला झोकून दिले. गुजरातचे मुख्यमंत्री आणि 2014 पासून ते आतापर्यंत दिल्लीचे नेतृत्व करण्याची संधी त्यांनी मिळवली. लोकप्रिय नेते म्हणून त्यांची जगभर प्रशंसा होते.
मंत्रिमंडळाकडून अभिनंदनाचा ठराव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेच्या केंद्रस्थानी सलग 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. राष्ट्र प्रथम आणि नागरिक प्रथम या तत्त्वांवर आधारीत त्यांच्या नेतृत्वाचा गौरव करण्यात आला. याविषयीचा ठराव मंजूर करण्यात आला. गुजरातमध्ये सलग तीनदा मुख्यमंत्री तर लोकसभेतील विजयाचाही उल्लेख यावेळी करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाचा गौरव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मोदींच्या नेतृत्वामुळे भारताला नवी दिशा मिळाली असे कौतुक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.