AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदी यांचे X वर 100 दशलक्ष फॉलोअर, विराट कोहलीलाही मागे टाकले, जगात केवळ एकच लीडर त्यांच्यापुढे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युट्युब चॅनलचे 25 दशलक्ष सब्सक्रायबर आहेत. तर इंस्टाग्रामचे 91 दशलक्ष फॉलोअर आहेत. त्यांनी आता एक्सवर 100 दशलक्ष फॉलोअर मिळविले आहेत.

नरेंद्र मोदी यांचे X वर 100 दशलक्ष फॉलोअर, विराट कोहलीलाही मागे टाकले, जगात केवळ एकच लीडर त्यांच्यापुढे
| Updated on: Jul 14, 2024 | 10:21 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडिया हाताळण्यात नेहमीच आघाडीवर असतात. मायक्रो ब्लॉगिंग साईट एक्सवर ( आधीचे ट्वीटर ) सर्वाधिक फॉलोअर असलेले जागतिक नेते बनले आहेत. नरेंद्र मोदी यांनी रविवारी सोशल साईट एक्सवर तब्बल 100 दशलक्ष ( 10 कोटी ) फॉलोअरचा टप्पा गाठला आहे. आता क्रिकेट स्टार विराट कोहली ( 64.1 दशलक्ष ) आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्रॅमी पुरस्कार विजेता गायिका टेलर स्विफ्ट ( 95.3 दशलक्ष ) यांच्याहूनही अधिक लोकप्रियता मोदी यांनी प्राप्त केली आहे. मोदी यांनी ग्लोबल लीडर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ( 38.1 दशलक्ष ) , दुबईचे राजे शेख मोहम्मद( 11.2 दशलक्ष ) आणि पोप फ्रान्सिस ( 18.5 दशलक्ष ) यांना देखील मागे टाकले आहे.

भारतीय नेत्यांमध्ये सोशल मिडीयावर एक्सवरील फोलोअरची तुलना केली असता मोदी खूपच पुढे आहेत. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी एक्सवर 26.4 दशलक्ष फॉलोअर आहेत. तर तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे एक्सवर 27.5 दशलक्ष, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे 19.9 दशलक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे 7.4 दशलक्ष फॉलोअर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर आंतरराष्ट्रीय स्टार टेलर स्विफ्ट ( 95.3 दशलक्ष ), लेडी गागा ( 83.1 दशलक्ष ) आणि किम कार्दाशियन ( 75.2 दशलक्ष ) यांना देखील मागे टाकले आहे. नरेंद्र मोदी यांनी इंडियन क्रिकेटर विराट कोहली,ब्राझिलियन फूट बॉलपटू नेमर ज्यूनियर ( 63.6 दशलक्ष ) आणि अमेरिकन फूटबॉलपटू लेब्रॉन जेम्स ( 52.9 दशलक्ष ) यांनाही मागे टाकले आहे. गेल्या तीन वर्षात एक्सवर सुमारे 30 दशलक्ष फॉलोअर वाढले आहेत. मोदी यांच्या युट्युब चॅनलचे 25 दशलक्ष सब्सक्रायबर आहेत. तर इंस्टाग्रामवर 91 दशलक्ष फॉलोअर आहेत.

मोदी यांच्या पुढे केवळ एकच नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सवर ( 100 दशलक्ष ) 10 कोटी इतके फॉलोअर बनून ग्लोबल लीडर झाले असले तरी त्यांच्यापुढे केवळ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आहेत. डेमोक्रॅटीक पक्षाचे नेते माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे 131.7 दशलक्ष फॉलोअर आहेत.तर तिसऱ्या क्रमांकावर डोनाल्ड ट्रम असून त्याचे एक्सवरील फॉलोअर 87.4 दशलक्ष आहेत.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना