Mann Ki Baat LIVE: कोरोना लसीबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका: नरेंद्र मोदी

Mann Ki Baat LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधत आहेत.

Mann Ki Baat LIVE: कोरोना लसीबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका:  नरेंद्र मोदी
PM Narendra Modi
| Updated on: Apr 25, 2021 | 11:46 AM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधत आहेत. ही त्यांची 76 वी मन की बात आहे. यामध्ये ते आरोग्य क्षेत्रातील विविध व्यक्तींशी संवाद साधत आहेत.  कोरोना लसीबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Apr 2021 11:45 AM (IST)

    गावा-गावांमध्ये जागरुकता दिसतेय

    नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये गावांमध्ये जागरुकता दिसत आहे. कोरोना नियमांचं पालन करण्याबाबत गावातील लोक आग्रही आहेत. कोरोनापासून गावांचं संरक्षण केलं जात आहे. बाहेरुन येणाऱ्या ग्रामस्थांसाठी वेगळ्या सोयी केल्या जात आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

  • 25 Apr 2021 11:42 AM (IST)

    देश एक होऊन लढतोय

    आज आपल्या देशातील आरोग्य सेवेतील लोक, फ्रंटलाईन वर्कर्स दिवस रात्र सेवा करत आहेत. समाजातील इतर लोक मागे राहिलेले नाहीत.देश पुन्हा एकदा एक होऊन कोरोना विषाणू संसर्गाविरुद्ध लढत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

  • 25 Apr 2021 11:37 AM (IST)

    कोरोनाच्या पहिल्या लाटेवर यशस्वीपणानं मात केल्यानंतर देशातील जनतेचे मनोधैर्य उंचावलेले: नरेंद्र मोदी

    कोरोनाच्या पहिल्या लाटेवर यशस्वीपणानं मात केल्यानंतर देशातील जनतेचे मनोधैर्य उंचावलेले होते. मात्र, दुसऱ्या लाटेने देशाला धक्का दिला. आपल्याला दुसऱ्या लाटेवर विजय मिळवायचा आहे. कोरोना संदर्भात तज्ञ, औषध उद्योग आणि ऑक्सिजन निर्मिती यावर बैठका घेत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

  • 25 Apr 2021 11:35 AM (IST)

    कॉर्पोरेट क्षेत्रानं कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी व्हावं: नरेंद्र मोदी

    देशातील कॉर्पोरेट क्षेत्रानं कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी व्हावं आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. भारत सरकार भविष्यामध्येही कोरोना लसीकरणाचा मोफत कार्यक्रम सुरु ठेवेल. राज्यांनी मोफत लसीकरणाचा कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवावा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.

  • 25 Apr 2021 11:33 AM (IST)

    केंद्र सरकार सर्व राज्यांना मोफत कोरोना लसी पाठवतंय: नरेंद्र मोदी

    केंद्र सरकार सर्व राज्यांना मोफत कोरोना लसी पाठवत आहे. कोणत्याही नागरिकानं कोरोना लसीबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.

  • 25 Apr 2021 11:31 AM (IST)

    कोरोना विषाणू संसर्गाच्या विरोधातील लढ्यामध्ये रुग्णवाहिका चालकांचं मोठं योगदान : नरेंद्र मोदी

    कोरोना विषाणू संसर्गाच्या विरोधातील लढ्यामध्ये रुग्णवाहिका चालकांचं मोठं योगदान आहे. माझ्या मनात त्यांच्याविषयी धन्यवादाची भावना आहे: नरेंद्र मोदी

  • 25 Apr 2021 11:29 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईच्या डॉ.शशांक जोशी यांच्याशी संवाद

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या डॉ.शशांक जोशी यांच्याशी संवाद साधला. आपल्याकडे जगातले सर्वात उत्कृष्ट उपचार उपलब्ध आहेत आपण पाहू शकता की, भारतात रूग्ण बरे होण्याचा दर सर्वात चांगला आहे. आपण युरोप किंवा अमेरिकेशी तुलना केली तर आमच्याकड़े रूग्ण उपचारांच्या नियमावलीनुसार बरे होत आहेत, असं डॉ शशांक जोशी म्हणाले.

  • 25 Apr 2021 11:27 AM (IST)

    केंद्र सरकारकडून सर्व राज्यसरकारांना विनामूल्य लस पुरवण्यात आली: नरेंद्र मोदी

    केंद्र सरकारकडून सर्व राज्यसरकारांना विनामूल्य लस पुरवण्यात आली आहे, जिचा लाभ 45 वर्षांवरील सर्व लोक घेऊ शकतात. आता 1 मे पासून देशात 18 वर्षांवरील प्रत्येकाला लस उपलब्ध होणार आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी