Asaduddin Owaisi : PAK वर तुटून पडणारे ओवैसी PM मोदींनी निमंत्रण देऊनही त्यांना भेटायला का गेले नाहीत?

Asaduddin Owaisi : पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी परदेश दौऱ्यावरुन परतलेल्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या मीटिंगमध्ये डेलिगेशनचे सर्व सदस्य सहभागी झाले. परंतु AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींच्या अनुपस्थितीने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण केले. ओवैसींनी या बैठकीला ते का हजर नव्हेत? त्यामागच कारण सांगितलं.

Asaduddin Owaisi : PAK वर तुटून पडणारे ओवैसी PM मोदींनी निमंत्रण देऊनही त्यांना भेटायला का गेले नाहीत?
Asaduddin Owaisi
| Updated on: Jun 11, 2025 | 11:46 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळाच्या सदस्यांसोबत बैठक झाली. यात जगभराचा दौरा करुन आलेले जवळपास सर्व खासदार सहभागी झाले होते. पण AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी या बैठकीत सहभागी झाले नाहीत. ओवैसींच्या अनुपस्थितीने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ओवैसींनी केंद्र सरकारला साथ दिली. पाकिस्तानवर ते तुटून पडलेले. पण अखेरीस असं काय झालं? ओवैसी पीएम मोदींसोबतच्या बैठकीत का सहभागी झाले नाहीत?

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांची शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशात पाठवली होती. त्यांनी पाकिस्तान विरुद्ध भारताची भूमिका मांडली. पंतप्रधान मोदींनी शिष्टमंडळाच्या सर्व सदस्यांची भेट घेतली. काँग्रेस खासदार शशी थरुर म्हणाले की, ‘पीएमनी सर्वांचे व्यक्तीगत आभार मानले’

असदुद्दीन ओवैसींनी काय स्पष्टीकरण दिलं?

डेलिगेशनच्या या बैठकीत ओवैसींच्या अनुपस्थितीने अनेक प्रश्न निर्माण केलेत. लोकांच्या सर्व प्रश्नांची उत्तर देताना ओवैसींनी बैठकीला अनुपस्थित राहण्याच कारण सांगितलं. “मी देशाच्या बाहेर आहे. मेडिकल इमरजन्सीमुळे मला दुबईला जावं लागलं. माझा नातेवाईक आणि बालपणीच्या मित्राची तब्येत अचानक बिघडल्यामुळे मला दुबईला जावं लागेल. मी माझ्या प्रतिनिधीमंडळाचे नेते बैजयंत पांडा यांना या बद्दल सूचित केलं होतं. व्यक्तीगत कारणामुळे मी या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही” असं स्पष्टीकरण असदुद्दीन ओवैसी यांनी दिलं.

‘अशावेळी आम्ही देशासोबत राहणार’

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवैसी पाकिस्तानावर तुटून पडले होते. ते म्हणाले की, “AIMIM आणि भाजपची विचारधारा वेगवेगळी आहे. त्यासाठी आम्ही नेहमीच लढत राहू. हा आमचा अंतर्गत विषय आहे. पण जेव्हा देशाचा विषय येतो. दुसरा कोणी आमच्या घरात घुसून आमच्या लोकांना मारणार असेल, तर वैचारिक मतभेद आणि राजकारण करण्याचा प्रश्नच येत नाही. अशावेळी आम्ही देशासोबत राहणार”


शशी थरुर काय म्हणाले?

परदेशात गेलेल्या शिष्टमंडळाचे अनुभव जाणून घेणं हा पंतप्रधान मोदींचा या बैठकीमागे उद्देश होता. काँग्रेस नेते शशी थरुर पीएम मोदींना म्हणाले की, ‘आम्ही ज्या-ज्या देशांचा दौरा केला, त्या लोकांना हा विचार आवडला’ “पंतप्रधानांसोबत ही अनौपचारिक बैठक होती. अनौपचारिक पद्धतीने चर्चा झाली. आपआपले विचार मांडले” असं शशी थरुर म्हणाले.