AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi Video : नरेंद्र मोदींचा नवा इन्स्टाग्राम व्हिडीओ, देशातील नागरिकांना मोठं आवाहन, म्हणाले, यावेळी…

देशातील विविध भागांमध्ये सरकारी यंत्रणा, सामाजिक संस्था आणि इतर संघटनांकडून तिरंगा फडकावण्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमांमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

Narendra Modi Video : नरेंद्र मोदींचा नवा इन्स्टाग्राम व्हिडीओ, देशातील नागरिकांना मोठं आवाहन, म्हणाले, यावेळी...
narendra modiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 11, 2026 | 5:41 PM
Share

Har Ghar Tiranga : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तरुणाईशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम, फेसबुक तसेच इतर सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करत आहेत. प्रत्येक व्हिडीओमध्ये ते देशातील नागरिकांना तसेच तरुणाईला विशेष संदेश देत आहेत. सध्या संपूर्ण देशात भारतीय स्वातंत्र्यदिनाची तयारी केली जात आहे. शासकीय पातळीवरही स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेविषयी सांगितले आहे.

मोदींनी केले नागरिकांना आवाहन

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियानाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा करावा, असे आवाहन मोदींनी केले. स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यासोबतच विकसित भारताच्या निर्मितीसाठी संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. ‘हर घर तिरंगा, हर मन में तिरंगा’ असा संदेश देत मोदी म्हणाले की, प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवून देशभक्तीची भावना अधिक मजबूत करूया, असेही मोदी या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.

अभियानाचा उद्देश केवळ ध्वज फडकवणे नसून…

‘हर घर तिरंगा’ अभियान ऑगस्ट महिन्यात देशभर राबवले जात आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांना आपल्या घरांसह दुकाने, कार्यालये आणि इतर ठिकाणी तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. मात्र, या अभियानाचा उद्देश केवळ ध्वज फडकवणे नसून नागरिकांच्या मनात तिरंग्याबद्दल अभिमान आणि देशाशी असलेली भावनिक नाळ अधिक घट्ट करणे हा आहे.

हर घर तिरंगा’ अभियानाची सुरुवात कधीपासून

देशातील विविध भागांमध्ये सरकारी यंत्रणा, सामाजिक संस्था आणि इतर संघटनांकडून तिरंगा फडकावण्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमांमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. ‘हर घर तिरंगा’ अभियानाची सुरुवात ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत करण्यात आली होती. त्यानंतर दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या आधी हे अभियान मोठ्या उत्साहात राबवले जाते.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा