Ram Vilas Paswan | रामविलास पासवान यांच्या जाण्याने देशाने द्रष्टा नेता गमावला: राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या जाण्याबद्दल शोकाकूल होत आदरांजली वाहिली आहे (PM Narendra Modi and other reaction on demise of Ram Vilas Paswan).

Ram Vilas Paswan | रामविलास पासवान यांच्या जाण्याने देशाने द्रष्टा नेता गमावला: राष्ट्रपती रामनाथ कोविंद
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 10:07 PM

नवी दिल्ली: बिहारच्या राजकारणातील मुरब्बी राजकारणी, लोकजनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं आज (8 ऑक्टोबर) दीर्घ आजाराने निधन झाले. यानंतर देशभरातून त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या जाण्याबद्दल शोकाकूल होत आदरांजली वाहिली आहे (PM Narendra Modi and other reaction on demise of Ram Vilas Paswan). रामविलास पासवान यांचं निधन माझ्यासाठी व्यक्तिगत नुकसान आहे. मी एक मित्र आणि मूल्याधिष्टित सहकारी गमावला आहे, अशी प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी रामविलास पासवान यांच्या जाण्याने खूप दुःखी आहे. देशाच्या राजकारणात एक मोठी पोकळी तयार झाली आहे. ही पोकळी कधीही भरुन निघणार नाही. रामविलास पासवान यांचं निधन हे माझ्यासाठी व्यक्तिगत नुकसान आहे. मी एक मित्र, मूल्याधिष्टित सहकारी आणि गरीबांना सन्मानाचं जगणं देण्यासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या व्यक्तीला गमावलं आहे. रामविलास पासवान हे राजकारणात खूप कष्टाने पुढे आले. एक युवा नेते म्हणून त्यांनी आणीबाणी काळात होणारे अन्याय आणि अत्याचार यांना प्रखर विरोध केला. ते उत्कृष्ट संसदपटू आणि मंत्री होते. त्यांनी अनेक धोरणं तयार करताना महत्त्वाचं योगदान दिलं.”

शरद पवार म्हणाले, “रामविलास पासवान यांच्या निधनाने दुःख झाले. ते एक ज्येष्ठ नेते आणि लोकशक्ती पक्षाचे संस्थापक होते. एक संसदपटू म्हणून माझा त्यांच्यासोबत जवळून संबंध आला. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझी सहवेदना.”

राहुल गांधी म्हणाले, “रामविलास पासवान यांच्या अवेळी जाण्याच्या बातमीने खूप दुःख झाले. गरीब-दलित वर्गाने आज आपला एक बुलंद राजकीय आवाज गमावला आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना.”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रामविलास पासवान यांच्या जाण्याने देशाने द्रष्टा नेता गमावला: राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नितीन गडकरी 

रामविलास पासवानजी यांच्या निधनाने एक मानवतावादी नेता गमावला : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या आकस्मिक निधनाने एक मानवतावादी नेता आपण गमावला आहे. गरिब आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला संघर्ष कायम स्मरणात राहील. रामविलास पासवान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. अनेक दशके त्यांनी जनतेच्या मनावर अधिराज्य केले. बिहारच्या विकासाला आणि राजकारणाला एक नवीन उंची त्यांनी प्रदान केली. सुमारे 9 वेळा त्यांनी संसदेत प्रतिनिधीत्त्व केले.”

“अतिशय विनम्र आणि लोकांच्या मदतीसाठी कायम धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने एक मानवतावादी नेता आपण गमावला आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न घेऊन त्यांच्याशी सातत्याने संवाद होत असे आणि प्रत्येकवेळी त्यांचा प्रतिसाद सकारात्मक असायचा. गरिब आणि वंचितांसाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. या महान नेत्याला माझी विनम्र श्रद्धांजली. त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांच्या दु:खात आपण सहभागी आहोत,” असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

राम विलास पासवान यांच्या निधनाबद्दल दुःख : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, “केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. पासवान हे व्यापक जनाधार असलेले बिहार राज्यातील लोकप्रिय नेते होते. केंद्रातील अनेक सरकारांमध्ये त्यांनी मंत्री म्हणून कार्य करताना विविध खाती समर्थपणे सांभाळली.”

“पासवान यांचा आणि माझा घनिष्ट परिचय होता. त्यांच्या निधनामुळे देशाने एक उत्तम संसदपटू आणि लोकप्रिय नेता गमावला आहे. दिवंगत आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करतो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आपल्या शोक संवेदना कळवतो,” असं राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले.

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने देशभर लोकप्रिय दलित नेता हरपला : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, “केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने देशभर लोकप्रिय असलेला दलितांचा द्रष्टा नेता; संसदीय राजकारणातील दलितांचा लोकप्रिय चेहरा हरपला आहे . त्यांच्या निधनाने देशाचे नुकसान झाले आहे. भारतीय राजकीय सामाजिक क्षेत्राचे कधीही भरून येणार नाही असे नुकसान झाले आहे.”

संबंधित बातम्या :

Ram Vilas Paswan | केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

PHOTO | रामविलास पासवान: भारतीय राजकारणातील संघर्ष नायक!

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आयसीयूमध्ये, पुत्र चिराग पासवान यांचे भावनिक पत्र

PM Narendra Modi and other reaction on demise of Ram Vilas Paswan

Non Stop LIVE Update
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.