AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पश्चिम बंगालच्या विजयानंतर मोदींचा थेट दिल्लीतून संदेश, मतदारांचे मानले आभार, भाजपा कार्यकर्त्यांचाही उल्लेख!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयातून भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सर्व भाजपा कार्यकर्त्यांचे, निवडणूक आयोगाचे आभार मानले. तसेच आम्ही आता पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी या ठिकाणी विकासासाठी कटिबद्ध राहू, असे आश्वासन दिले.

पश्चिम बंगालच्या विजयानंतर मोदींचा थेट दिल्लीतून संदेश, मतदारांचे मानले आभार, भाजपा कार्यकर्त्यांचाही उल्लेख!
narendra modi speechImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 04, 2026 | 7:50 PM
Share

Narendra Modi Speech Live : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी या एकूण पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आसाममध्ये पुन्हा एकदा विजय संपादन केला आहे. सोबतच पश्चिम बंगालमध्येही भाजपाने निवडणूक जिंकली आहे. येथे भाजपाने तृणमूल काँग्रेसला सत्तेतून खाली खेचले आहे. दरम्यान, या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयातून भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सर्व भाजपा कार्यकर्त्यांचे, निवडणूक आयोगाचे आभार मानले. तसेच आम्ही आता पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी या ठिकाणी विकासासाठी कटिबद्ध राहू, असे आश्वासन दिले.

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा…

मी भाजपाच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. आज भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कमाल केली आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नवा इतिहास रचला आहे. भाजपा पक्षाचे अध्यक्ष नितीन नबीन यांनी अध्यक्षपद सांभाळल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. त्यांचे भाजपाच्या कार्यकर्त्यांना अमूल्य असे मार्गदर्शन लाभले. आज पोटनिवडणुकीचा निकालही चांगला लागला आहे. महाराष्ट्र, नागालँड, त्रिपुरा येथील पोटनिवडणुकीत जनतेने आपल्या उमेदवारांना आशीर्वाद दिले. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा मोठा विजय झाला आहे. या सर्वच राज्यांतील जनतेचे मी आभार मानतो, असे मोदी म्हणाले.

मी आज निवडणूक आयोगाचे…

तसेच, विजय आणि पराभव हा लोकशाहीतील एक स्वाभाविक भाग आहे. परंतु पाच राज्यांतील जनतेने भारत मदर ऑफ डेमोक्रेसी आहे, पूर्ण जगाला दाखवून दिलंय. आज फक्त लोकशाहीच नव्हे तर भारताचे संविधानही विजयी झाले आहे आज देशातील संवैधानिक संस्था, लोकशाही प्रक्रियेचा विजय झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये 93 टक्के मतदान झाले आहे. हा एक नवा इतिहास आहे. आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळम या ठिकाणीही मतदानाचा नवा विक्रम स्थापित झाला. या ठिकाणी महिला मतदारांची संख्या लक्षणीय राहिली. मी आज निवडणूक आयोग, निवडणूक आयोगाचे अधिकारी, कर्मचारी, मतदान प्रक्रियेत सहभागी असणारे कर्मचारी, सुरक्षाबल यांचे मी अभिनंदन करतो, असेही मोदी यावेळी म्हणाले.

मी काशीमध्ये गेलो होतो तेव्हा…

आज गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत कमळ फुललेले आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यात आता भाजपाचे सरकार आहे. मित्रांनो 2013 साली भारतीय जनता पक्षाने मला पंतप्रधानपदासाठी उमेदवारी दिली. मी काशीमध्ये माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा मी म्हणालो होतो की मला गंगामातेने बोलावले आहे, असे म्हणालो होतो. गंगा मातेचे आपल्यावर आशीर्वाद आहेत. आपल्यावर कामाख्या देवीचे आशीर्वाद आहेत. आसाममध्ये तेथील मतदारांनी सलग तिसऱ्या वेळी भाजपा, एनडीएला मतं दिली आहेत, असं म्हणत आता आम्ही विकासासाठी कटिबद्ध आहोत, असे आश्वासन जनतेला दिले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी