…तर आमच्या अटींवर, आमच्या पद्धतीने उत्तर देऊ, नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा!

ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सेनेले संबोधित केले आहे. ते आज भारताने राबवलेल्या या मोहिमेनंतर मोदी यांनी आदमपूर हवाई तळाला खास भेट देऊन तेथील जवानांचे मनोबल वाढवले.

...तर आमच्या अटींवर, आमच्या पद्धतीने उत्तर देऊ, नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा!
narendra modi
| Updated on: May 13, 2025 | 4:20 PM

Narendra Modi Speech : ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सेनेले संबोधित केले आहे. ते आज भारताने राबवलेल्या या मोहिमेनंतर मोदी यांनी आदमपूर हवाई तळाला खास भेट देऊन तेथील जवानांचे मनोबल वाढवले. सोबतच त्यांनी भारताची तसेच भारतीय सेनेच्या आगामी भूमिकेबाबतही थेट भाष्य केलं. विशेष म्हणजे यापुढे भारत दहशतवादी कारवायांना थेट आणि चोख प्रत्युत्तर देणार आहे. आम्ही आमच्या अटींवर या कारवाया करू, असं मोदी यांनी म्हटलंय.

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भीक घालणार नाही

ऑपरेशन सिंदूर हे भारताचे न्यू नॉर्मल आहे. भारताने आता तीन सूत्र समोर ठेवली आहेत. यापुढे भारतावर हल्ला झाला तर भारत आपल्या शर्तींवर, आपल्या पद्धतीने आणि आपल्या वेळेनुसार उत्तर देणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणीही अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भीक घालणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे दहशतवादाचे आका आणि दहशतवादाला पाठिंबा देणारे सरकार याला वेगवेगळं पाहणार नाही.

मोदी यांनी केले भारतीय सैन्याचे कौतुक

जगदेखील भारताच्या या नव्या रुपाला, नव्या रुपाला समजून घेत पुढे जात आहे. ऑपरेशन सिंदूरचा एक-एक क्षण भारतीय सेनेच्या सामर्थ्याची सक्ष देत आहे. या काळात भारतीय सेनेची सुसूत्रता फारच चांगली होती. नौदलाने समुद्रावर आपली ताकद दाखवून दिली. भूदलाने सीमेवर लक्ष ठेवलं तर भारतीय वायूसेनेने हल्लाही केला आणि संरक्षणही केलं. बीएसएफ तसेच अन्य दलांना अद्भूत क्षमता दाखवले, असे तोंडभरून कौतुक मोदी यांनी केले.

मला भारतीय जवानांचा अभिमान

भारतीय सेनेच्या सामर्थ्याची ही ओळख झाली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये मनुष्यबळासोबतच मिशिनींची सुसूत्रता फारच चांगली राहिलेली आहे. पाकिस्तानने लाखो प्रयत्न केले. पण आपले हवाई तळ असो किंवा अन्य सैन्य ठिकाणं यांना काहीही झालं नाही. याचं श्रेय सर्व जवानांना जात आहे. मला सर्व जनवांनाचा अभिमान आहे, असंही मोदी म्हणाले.

भारताने कारवाई फक्त स्थगित केली

भारताने फक्त सैन्य कारवाई स्थगित केली आहे. जर पाकिस्तानने अतिरेकी कारवाई केली किंवा सैन्याने हालचाल केली तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ. हे उत्तर आमच्या अटीवर देऊ. जवानांनी धैर्य असंच कायम ठेवावे. आपल्याला कायम सावध आणि तयार राहिलं पाहिजे, अशा सूचना मोदी यांनी भारतीय जवानांना दिल्या.