AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udaipur Murder Case : उदयपूर हत्याकांडानंतर प्रशासन सतर्क, परिसरात 600 पोलीस तैनात

मी वारंवार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना सांगत आहे, देशाला संबोधित करा. उदयपूरची ही घटना काही किरकोळ घटना नाही, कोणीही हे करू शकतो हे कल्पनेपलीकडचे आहे. अशा वेळी तणाव निर्माण होऊ नये, सर्वांनी एकत्र राहावे, अशी आमची इच्छा आहे. या घटनेतील दोषींना सोडले जाणार नाही, असे अशोक गहलोत म्हणाले.

Udaipur Murder Case : उदयपूर हत्याकांडानंतर प्रशासन सतर्क, परिसरात 600 पोलीस तैनात
उदयपूर हत्याकांडानंतर प्रशासन सतर्क
| Updated on: Jun 29, 2022 | 12:39 AM
Share

उदयपूर : राजस्थानमधील उदयपूरमध्ये एका व्यक्तीची भरदिवसा निर्घृण हत्या (Murder) केल्यानंतर राज्यात तणाव (Tension) पसरला आहे. या घटनेचा एक भयानक व्हिडिओ समोर आल्यानंतर याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण अधिकच संवेदनशील (Sensitive) बनले आहे. संपूर्ण राज्यात गस्त वाढवण्याचे आदेश एसपी आणि आयजींना दिले आहेत. अधिकाऱ्यांसह सुमारे 600 पोलिसांचा फौजफाटा उदयपूरमध्ये पाठवण्यात आला असून, आणखी काही फौजफाटा पाठवण्यात येणार आहे. हत्येची माहिती मिळताच परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आम्ही पथके पाठवली आहेत, असे उदयपूरचे एसपी मनोज कुमार यांनी सांगितले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओही आम्ही पाहिला आहे. गुन्हेगाराची जात नसते. पीडित कुटुंबाला शक्य तेवढी मदत केली जाईल, तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असे उदयपूरचे जिल्हाधिकारी तारा चंद मीना म्हणाले.

हत्येची बाब दुःखद आणि लज्जास्पद – अशोक गेहलोत

या घटनेबाबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अशाप्रकारे एखाद्याची हत्या होणे ही चिंतेची बाब आहे, हे दुःखद आणि लज्जास्पद आहे. वातावरण सुधारण्याची गरज आहे, संपूर्ण देशात तणावाचे वातावरण आहे. मी वारंवार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना सांगत आहे, देशाला संबोधित करा. उदयपूरची ही घटना काही किरकोळ घटना नाही, कोणीही हे करू शकतो हे कल्पनेपलीकडचे आहे. अशा वेळी तणाव निर्माण होऊ नये, सर्वांनी एकत्र राहावे, अशी आमची इच्छा आहे. या घटनेतील दोषींना सोडले जाणार नाही, असे अशोक गहलोत म्हणाले. (Police administration alerted after Udaipur murder case, 600 police deployed in the area)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...