
Hotel Raid : हॉटेलमध्ये अनैतिक कृत्ये सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पलीस घटनास्थळी धाड टाकतात आणि 5 कपल्सना ताब्यात घेतात… अशा घटना सर्रास घडत असतात… अता देखील असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका हॉटेलच्या वेगवेगळ्या 5 खोल्यामध्ये 5 कपल्स असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी कारवाई करत सर्वांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या कुटुंबियांना याबद्दल सांगितलं… तेव्हा मुली ढसाढसा रडू लागल्या आणि पोलिसांना असं काही म्हणाल्या ज्यामुळे तुम्ही देखील हैराण व्हाल…
सध्या पोलीस या प्रकरणी कसून चौकशी करत आहेत. दरम्यान एक गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे, सर्व मुलं आणि मुली अल्पवयीन आहेत. 10 जणांचे कागदपत्र तपासण्यात आल्यानंतर मुलं अल्पवयीन असल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पोलिसांनी कारवाई केली आहे.
रडत काय म्हणाल्या मुली…
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुली ढसाढसा रडू लागल्या आणि म्हणाल्या, ‘आम्हाला सोडून द्या नाहीतर घरातले आम्हाला मारून टाकतील… ‘, पोलिसांनी त्या मुला-मुलींना महिला पोलिस स्टेशनमध्ये नेलं. सर्वजण महाविद्यालयीन विद्यार्थी होते. संबंधित घटना, कैथल येथील कर्नाल रोड येथे असलेल्या रिलॅक्स हॉटेलमध्ये घडली आहे.
सर्व तरुण-तरुणींच्या नातेवाईकांना बोलावण्यात आलं, त्यांनतर त्यांची समज घालून घरी पाठवण्यात आलं. पथकाने हॉटेलचा सीसीटीव्ही डीव्हीआर देखील जप्त केला. पोलिस तपासादरम्यान, हॉटेलमध्ये कोणीही संशयास्पद परिस्थितीत आढळलं नाही. पोलीस आता या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत… पण तरुण – तरुणींना अटक केल्यानंतर परिसरात खळबळ माजली आहे…
महिला पोलिस स्टेशनच्या प्रभारी एसआय वीणा यांनी सांगितले की, कर्नाल रोडवरील रिलॅक्स हॉटेलमध्ये अनैतिक कृत्ये होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना सतत येत होत्या. त्यामुळे धाड टाकण्यात आली… तक्रार मिळताच पोलिसांनी एक पथक तयार करून हॉटेलवर छापा टाकला आणि पाच खोल्यांमध्ये पाच मुले आणि पाच मुली आढळल्या. परिसरात कोणतंच बेकायदेशीर किंवा वाईट काम खपवून घेतलं जाणार नाही…’ असं देखील वीणा म्हणाल्या…